Home /News /viral /

Viral Video : आजीचे प्राण वाचविण्यासाठी लहानग्याने केला उधळलेल्या वळूशी मुकाबला, 'शूटर दादी' म्हणाली...

Viral Video : आजीचे प्राण वाचविण्यासाठी लहानग्याने केला उधळलेल्या वळूशी मुकाबला, 'शूटर दादी' म्हणाली...

वळुने त्याला शिंगावर घेत दूर फेकलं..पण तो घाबरला नाही..

    नवी दिल्ली : हरियाणाच्या 'शूटर दादी (Shooter Dadi)' या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर (Chandro Tomar) सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्या ट्विटरवर कायम विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करीत असतात. त्यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. इंटरनेटवर या मुलाच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका उधळलेल्या वळूच्या हल्ल्यापासून आपल्या आजीला वाचवण्यासाठी एक लहानगा पुढे आला. तो घाबरला नाही, तर आजीला त्या वळुच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत होता. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर महिला गल्लीतून जात आहे. तोच समोर उभा असलेल्या एका वळूने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर महिला खाली कोसळली. पुढली काही सेकंदात आजीचा नातू धावत आला व त्याने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला. वळूने मुलावरही हल्ला केला पण मुलाने आजीला सोडलं नाही. हे ही वाचा-VIDEO : कोरोना काळात नवरीला अशी लावली हळद; आता मंगळसूत्र घालायला ड्रोनच मागवा तर तो आजीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता. चंद्रो तोमर (Dadi Chandro Tomar) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपल्या आजीसाठी असलेलं प्रेम व तिला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या नातवाला सन्मान मिळायला हवा. व्हिडीओ शेअर करीत चंद्रो तोमर (Dadi Chandro Tomar Twitter) पुढे असंही म्हणाल्या की, हा व्हिडीओ हरियाणातील महेंद्रगड भागातील आहे. दादीने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे. आणि नेटकरीदेखील मुलाच्या धाडसाचं कौतुक करीत आहेत. चंद्रो तोमर जगातील वयस्कर शूटर आहेत. यांच्याबाबत बॉलिवूडमध्ये चित्रपटही आला होता. याचे नाव 'सांड़ की आंख हा असून यामध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकरने मुख्य भूमिकेत काम केलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या