विजेंद्र कुमार/जिंद, 29 सप्टेंबर : बँकेतील (bank) दरोडा, चोरी अशा बऱ्याच घटना तुम्ही ऐकल्यात, वाचल्यात, पाहिल्यात. अशा घटनांचे व्हिडीओदेखील (video) पाहिले आहेत. मात्र अशी चोरी अवघ्या 11 वर्षांच्या मुलाने केली असेल असं सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. 11 वर्षांच्या मुलाने चक्क बँकेत चोरी (bank robbery) केली आहे. तीदेखील 20 लाखांची. त्यातही धक्कादायक म्हणजे फक्त 36 सेकंदात त्याने इतकी मोठी रक्कम लंपास केली आहे.
ही घटना घडली आहे ती हरयाणाच्या (haryana) जिंद जिल्ह्यात. पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) 11 वर्षांच्या मुलाने चोरी केली आहे. खरंतर असं नुसतं कुणी सांगितलं तर साहजिकच यावर विश्वास बसणार नाही. एवढासा मुलगा बँकेत आणि इतक्या रुपयांची चोरी करणं शक्यच नाही असं तुम्हीही म्हणाल. मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर आधी हा व्हिडीओ नीट पाहा.
आधीपासून बँकेत असलेला हा मुलगा कॅशिअर नसल्याचं पाहतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो. लहान असल्यामुळे बँकेतील इतर लोकांचं त्याच्याकडे लक्षही जात नाही. तो इतक्या शिताफीने चोरी करतो की कदाचित त्याने याआधीदेखील चोरी केलेल्या असाव्यात किंवा त्याला चोरीसाठी ट्रेनिंगच दिलेलं असावं.
हे वाचा - भरधाव वेगानं आला ट्रक, रस्त्यावरील 4 गाड्यांना चिरडून घराच्या दिशेनं गेला आणि...
संधी मिळताच या मुलाने चांगलाच डाव साधला. ज्यावेळी त्याने चोरी केली त्यावेळी कुणालाही त्याच्यावर संशय आला नाही. त्यामुळे चोरी झाली तेव्हा काहीच समजलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळेला ही चोरी झाली होती. मात्र जेव्हा संध्याकाळी कॅश मोजली गेली तेव्हा त्यामध्ये 20 लाख रुपये कमी असल्याचं समजलं आणि मग सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे सर्वकाही दिसलं.
हे वाचा - पुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर गाठलं पोलीस स्टेशन
एचएचओ हरी ओम यांनी सांगितलं की कॅशिअरच्या हलगर्जीपणामुळे ही चोरी झाली. कॅशिअर केबिनचा दरवाजा खुला ठेवूनच वॉशरूमला गेला होता आणि त्याच वेळी त्यावेळी आधीपासून लक्ष ठेवून असलेला हा छोटा मुलगा लगेच त्याच्या केबिनमध्ये घुसला आणि बॅगेत पैसे भरून फरार झाला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या मुलाचा शोध सुरू आहे.