वॉशिंग्टन, 04 ऑक्टोबर : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला होमक्वारंटाइन केलं होतं मात्र शनिवारी त्यांना ताप, सर्दी आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे आर्मी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पुढचे 48 तास ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. अमेरिकेत एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार सुरू आहेत अशा परिस्थिती ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्या प्रचार सभादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं. त्यानुसार पुढचे 48 तास ट्रम्प यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने ट्रम्पचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज यांचा हवाला देत म्हटले आहे की अध्यक्षांची स्थिती "अत्यंत चिंताजनक" आहे.
I feel much better now. We are working hard to get me all the way back. I have to be back because we still have to make America great again: US President Donald Trump at Walter Reed Hospital
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्याची पत्नी मेलेनिया यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वत:ला व्हाइट हाऊसमध्ये क्वारंटाइन केलं आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी कोरोनाच्या रिपोर्टबद्दल स्वत: ट्वीट करून माहिती दिली होती. ट्रम्प यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत: ला क्वारंटाइन केलं होतं. त्यानंतर कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ट्रम्प लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा प्रचारासाठी उभे राहावेत अशी प्रार्थना अनेकांनी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ट्रम्प यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर थोडे भावुक झाले होते. त्यांनी देखील ट्रम्प लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.