मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वासामुळे तोंड फिरवू नका; आरोग्यसाठी फायदेशीर आहे शेपू; पचन सुधारेल, वजनही होईल कमी

वासामुळे तोंड फिरवू नका; आरोग्यसाठी फायदेशीर आहे शेपू; पचन सुधारेल, वजनही होईल कमी

हाडं मजबूत करण्यासाठी शेपू खावी.

हाडं मजबूत करण्यासाठी शेपू खावी.

शेपूच्या पानांचा वास आवडत नसेल तरी, त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए,आयर्न,कॅल्शियम आणि मॅग्नीज सारखे अनेक पोषक घटक (Nutrition) असतात. ज्यामुळे,त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे(Health Benefits) असतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 जुलै : पाले भाज्यांमध्ये जास्त उग्र वास आणि वेगळी चव असलेली भाजी म्हणजे शेपूची भाजी (Soya Leaves). या भाजीला पाहूनच काही लोक तोडं वाकड करतात. काहीनां तिचा वासच सहन होत नाही. तरी, ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits) असतात. असल्याने खायला हवी.

शेपूची भाजीची चव चांगली बनवण्यासाठी काही लोक तिला बटाटे, डाळ, शेंगदाण्याचा कूट घालून करतात. शेपू मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए,आयर्न,कॅल्शियम आणि मॅग्नीज सारखे अनेक पोषक घटक (Nutrition) असतात. त्यामुळेच हा भाजी खायला हवी. पाहूयात शेपूच्या भाजीत किती पोषक घटक असतात आणि त्यामुळे आरोग्याला किती फायदे होतात.

पचन सुधारतं

शेपूच्या पानांमध्ये अ‍ॅन्टीअम्फ्लामेन्ट्री गुणधर्म असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. यात भरपूर फायबर आहे त्यामुले गॅस, अपचन, पोट फुगणं यासारखे त्रास होत नाहीत. त्यामुळे बद्धकोष्ठतासारखी समस्याही दूर होते.

निद्रानाशची समस्या दूर होते

आजच्या लाईफस्टाईलमुळे निद्रानाशाची समस्या सामान्य झाली आहे. शेपूची हा त्रास दूर करण्यात खूप मदत करते. शेपूमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळतं. यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास देखील खूप मदत होते आणि तणाव देखील कमी होतो.

वजन कमी करण्या मदत

शेपूची पानं वजन कमी करण्यातही खूप मदत करतात. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि ही पानं अ‍ॅन्टीऑक्सिडन्टने समृद्ध असतात. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात मदत करतात आणि मेटबॉलिजम सुधारण्यात मदत करतात.

मेटबॉलिजम सुधारतं

शेपूची पानं मेटबॉलिजम वाढवण्यात देखील उपयुक्त ठरतात. यामुळे शरीरातील चरबी वितळते. ही पानं चहा किंवा ग्रीन टीमध्येही वापरू शकतो.

हाड मजबूत होतात

हाडं मजबूत करण्यासाठी शेपू खावी. हाडांची ताकद वाढवण्यासाठी  शेपू फार औषधी मानली जाते. एवढेच नही तर हाडांमधील वेदना कमी करण्यासही खुप उपयुक्त ठरते.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle