नवी दिल्ली, 25 जुलै : हल्ली युट्युब आणि इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी सर्रास होऊ लागलेला आहे. परीक्षेसाठी किंवा एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपण सहजपणे सर्चिंग करतो. अनेक शाळा, कॉलेज यांच्या अभ्यासक्रमाची, परीक्षांची माहिती देखील इंटरनेट किंवा यूट्यूबवर आपल्याला मिळते. यूपीएससी (UPSC Exam) सारख्या कठीण परीक्षेची माहिती सुद्धा आपल्याला इंटरनेटवरून देऊ शकतं. 2016 मध्ये रोमा यांनी इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. त्यानंतर लगेचच यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) दिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी सातत्याने अभ्यास करून पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळी UPSC परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना इंडियन पोस्ट अँड टेलीफोन सर्विसमध्ये संधी मिळाली. मात्र रोमा यांनी 2018 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि 70वा रँक मिळवत IAS आपलं होण्याचे (IAS Officer) स्वप्न पूर्ण केलं.
(YouTube वर पाहून त्वचेवर करू नका भलते प्रयोग; साइड इफेक्टमुळे व्हाल हैराण)
UPSC सिव्हील सेवा परीक्षा 2019 मध्ये 70वा रँक मिळवणाऱ्या IAS ऑफिसर रोमा श्रीवास्तव (IAS Officer Roma Srivastava) यांनी आपला अभ्यास इंटरनेट आणि यूट्यूबच्या माध्यमातून केलेला आहे. त्यांनी UPSC परीक्षा 3 वेळा दिली आणि होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
रोमा श्रीवास्तव यांनी UPSC परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. उलट सेल्फ स्टडीवर भर दिला. यासाठी त्यांनी इंटरनेट आणि युट्युबचा वापर केला.
(इच्छा असूनही चवीमुळे पित नाही ग्रीन टी; या पद्धतीने होईल टेस्टी)
UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोमा यांनी महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्यामते कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये जाऊन अभ्यास करणं शक्य नसेल तर, UPSCच्या वेबसाईटवरून अभ्यासक्रम मिळवून त्यानुसार स्टडी मटेरियल तयार करावं. कोणतीही अडचण आली तरी, इंटरनेट किंवा युट्युबच्या मदतीने त्या सोडवता येतात असंही रोमा सांगतात. रोमा यांच्यामते यूपीएससी परीक्षेसाठी अभ्यास आणि रिवीजन महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Inspection, Success story, Upsc exam