मुंबई, 03 मार्च : मला चंद्रावर (moon) जायचं आहे, असं अगदी लहानपणापासून अनेकांचं स्वप्नं असतं. तुम्हीदेखील असं स्वप्नं पाहिलं असेल तर आता ते प्रत्यक्षात साकार होण्याची वेळ जवळ आली आहे. तुम्हाला चंद्रावर जाता येणार (tour on moon) आहे, तेसुद्धा मोफत. हो एकही पैसा न देता चंद्रावर (fly to moon) जाण्याची संधी तुम्हाला मिळते आहे. पण यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे.
जपानचे अब्जाधीश युसाकू मेजवा हे तुम्हाला आपल्यासोबत चंद्रावर घेऊन जाणार आहेत. फक्त आठ लोकांनाच ही संधी मिळणार नाही. आपल्यासोबत आठ सामान्य नागिरकांनी चंद्रावर यावं अशी त्यांची इच्छा आहे, त्याची घोषणादेखील त्यांनी केली आहे.
युसाकू मेजवा हे एलन मस्कच्या स्पेसएक्स विमानातून चंद्रावर यात्रा करणार आहेत. स्पेसएक्समार्फत 2018 साली चंद्रावर यात्रेसाठी मेजवा यांची पहिला खासगी प्रवासी म्हणून निवड करण्यात आली होती. या मिशनचं नाव आहे, डिअर मून. 2023 मध्ये ही मोहीम होणार आहे.
Watch this video to learn more about the selection process. It also contains a special message from @elonmusk #dearMoon
↓Check the full versionhttps://t.co/i3ucR6BB44 pic.twitter.com/B3d8g0JvvP — Yusaku Maezawa (MZ) (@yousuckMZ) March 2, 2021
त्यांनी आपल्या ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. युसाकू म्हणाले, धरतीवर नागरिकांपैकी काही लोक माझ्यासोबत यावेत. या यात्रेचा पूर्ण खर्च ते स्वतः उचलणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यासोबत जे येतील त्यांना मोफत अंतराळात घेऊन जाणार आहेत. मी सर्व तिकिट खरेदी केल्या आहेत. त्यामुळे ही एक खासगी यात्रा असेल.
यासोबतच एक फॉर्मही शेअर करण्यात आला आहे. पण हा अर्ज भरण्यासाठी व्यक्तीला दोन अटी पूर्ण कराव्या लागलीत. पहिली अट म्हणजे ती व्यक्ती जे काही काम करत आहे, ते अशा पद्धतीनं पुढे न्यावं ज्यामुळे इतर लोक आणि समाजाची मदत होईल. आणि दुसरी अट म्हणजे त्यांच्याप्रमाणे समान आकांक्षा ठेवणाऱ्या इतर चालक दलाच्या सदस्यांचंही त्यांनी समर्थन करावं.
याआधी मेजवा फक्त काही कलाकारांनाच आपल्यासोबत नेणार होते पण आता त्यांनी सर्वांनाच आमंत्रित केलं आहे. जर तुम्ही स्वतःला कलाकार समजता तर तुम्ही कलाकार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Moon, Space, Space-x, Technology