मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! 2050 पर्यंत ऐकण्याची क्षमता होणार कमी; WHOचा इशारा

सावधान! 2050 पर्यंत ऐकण्याची क्षमता होणार कमी; WHOचा इशारा

कानातल्या मळाबद्दल ऐकल तरी आपल्याला घाण वाटायला लागते.

कानातल्या मळाबद्दल ऐकल तरी आपल्याला घाण वाटायला लागते.

कानांचे विकार, ऐकू न येणं या समस्येला आज अनेक जण तोंड देत आहेत. जगभरात लोकसंख्या वाढत असताना लोकांना या विकारासह अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

नवी दिल्ली, 3 मार्च: कानांचे विकार, ऐकू न येणं या समस्येला आज अनेक जण तोंड देत आहेत. जगभरात लोकसंख्या वाढत असताना लोकांना या विकारासह अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. 2050 पर्यंत जगभरातील प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीला ऐकू न येण्याच्या समस्येला (Hearing Problem) तोंड द्यावे लागेल, असा इशारा नुकताच जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation) दिला आहे. याचा अर्थ 2050 पर्यंत अनेक लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होणार आहे. मंगळवारी याबाबत सूचना देताना WHOने म्हटलं आहे की या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना आणि प्रतिबंधासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.

WHOने आपल्या अहवालात म्हटलं आहे की अनेक कारणांचा विचार करुन ही समस्या रोखता येऊ शकते. त्यांच्या मते, जन्मावेळीच ऐकण्याची समस्या उद्भवणे, आजारपण, जगभरात ध्वनी प्रदूषणात झालेली वाढ आणि जीवनशैलीत झालेला बदल ही यामागील कारणं असू शकतात. या समस्येपासून लोकांचा बचाव करण्यासाठी एक खास पॅकेज तयार करण्याचा प्रस्ताव WHOने दिला आहे. त्यांच्या मते या पॅकेजची किंमत प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी 1.33 डॉलर असू शकेल. जर या समस्येत वाढ झाली तर जगाला दरवर्षी सुमारे 1 लाख कोटींचा तोटा सहन करावा लागू शकतो. या समस्येवर उपाय म्हणून उचलेली पावली अयशस्वी ठरली तर लोकांच्या आनंद आणि आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचे दिसून येईल. तसेच अशा व्यक्ती शिक्षण, नोकरी आणि दळणवळणापासून दूर गेल्यामुळे मोठे अर्थिक संकटही (Economical Crisis) उद्भवू शकते, असं या अहवालात म्हटलं आहे.

(हे पाहा: मंगळावरच्या रोव्हरला स्वतःच्या घरातून नियंत्रित करतोय हा भारतीय शास्त्रज्ञ  )

अहवालानुसार, सध्या जगातील प्रत्येकी 5 पैकी एका व्यक्तीस ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. परंतु, येत्या तीन दशकांमध्ये ऐकण्याची क्षमता कमी होण्याची समस्या असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याचा परिणाम जगभरातील 2.5 अब्ज लोकांवर होऊ शकतो. 2019 मध्ये या समस्येने ग्रस्त असलेल्यांची संख्या 1.6 अब्ज होती. 2050 मध्ये 2.5 अब्ज लोकांपैकी 70 कोटी लोकांना हा आजार गंभीर झाल्याने समस्यांचा सामना करावा लागेल.

https://hindi.news18.com/news/world/who-warns-one-in-four-people-in-world-will-suffer-hearing-problem-by-2050-3492967.html

First published:
top videos

    Tags: Ear, Health, Hearing problems, India, Wellness, Who