मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'यामुळे मी प्रेग्नेंट होईल?' एकट्या असताना गुगलवर काय काय सर्च करतात अविवाहित तरुणी

'यामुळे मी प्रेग्नेंट होईल?' एकट्या असताना गुगलवर काय काय सर्च करतात अविवाहित तरुणी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

महिला (Women) आणि अविवाहित तरुणी (Unmarried Women) गुगलवर ज्या गोष्टी जास्त सर्च करतात, त्याची माहिती डेटा सर्चमधून समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 4 जुलै : पूर्वीच्या काळी एखाद्या गोष्टीचा संदर्भ किंवा उत्तर शोधण्यासाठी संबंधित विषयाची अनेक पुस्तकं, ग्रंथ वाचावे लागत असत. परंतु, गेल्या काही वर्षांत इंटरनेटमुळे (Internet) मोठी क्रांती झाल्याचं दिसून येतं. गुगल सर्चच्या (Google Search) माध्यमातून आपण कोणत्याही गोष्टीचे संदर्भ, उत्तरं अगदी एका क्लिकवर मिळवू शकतो. त्यामुळे गुगल सर्च आपला खऱ्या अर्थाने मित्र झाला आहे. रोज गुगलवर अनेक गोष्टींच्या अनुषंगाने सर्चिंग केलं जातं. मनात आलेल्या अगदी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी गुगल सर्चचा वापर केला जातो.

    गुगलवर नेमक्या कोणत्या सर्चेस केल्या जातात, याची माहिती गुगलकडे जमा होत असते. प्रत्येक वयोगटातली व्यक्ती नेमक्या कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करत असेल, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याच अनुषंगाने महिला (Women) आणि अविवाहित तरुणी (Unmarried Women) गुगलवर ज्या गोष्टी जास्त सर्च करतात, त्याची माहिती डेटा सर्चमधून समोर आली आहे. अविवाहित तरुण मुली, कोणत्या गोष्टींमुळे प्रेग्नंट (Pregnant) होता येईल या विषयापासून ते मला कोणता टॅटू (Tatto) सूट होईल इथपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तर गुगल सर्चमधून मिळवतात, असं दिसून आलं आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    सर्वसामान्यपणे आपल्या ग्रुपमध्ये असा एक मित्र असतो, त्याला सर्वच गोष्टींची माहिती असते; पण आता ही जागा गुगल सर्चने घेतली आहे. गुगल सर्चचे रिझल्ट प्रायव्हेट असले तरी कालांतराने ते जनरल लिस्टच्या माध्यमातून समोर येत असतात. अविवाहित तरुणी एकट्या असताना गुगलवर नेमकं काय सर्च करतात, या प्रश्नात 'मी कोणत्या गोष्टींमुळे प्रेग्नंट होईन,' हा प्रश्नही समाविष्ट आहे. महिलांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या प्रश्नाबाबत निर्णय घेण्यासाठी अनेक महिला गुगलवर सर्च करतात. समाजात लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक अविवाहित तरुणी याविषयी गुगलवर सर्च करतात.

    बहुतांश महिला वजन कमी कसं करायचं (Weight Loss) याविषयी गुगलवरून माहिती मिळवतात. अविवाहित तरुणी फारसे कष्ट न घेता वजन कसं कमी करायचं याविषयीच्या ट्रिक्स गुगलकडून जाणून घेतात. वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार कसा असावा, शरीरासाठी कोणते पदार्थ योग्य आहेत. कोणत्या पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात, हेदेखील तरुणी गुगल सर्चच्या माध्यमातून जाणून घेतात. महिलांच्या दृष्टिकोनातून गुगल मोस्ट सर्च्डमध्ये टॅटू हा विषय प्राधान्याने दिसून येतो. टॅटूविषयी तरुणी सर्वाधिक सर्चिंग करतात.

    सध्याच्या काळात बहुतांश जणांचं सोशल मीडियावर अकाउंट आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्सची (Followers) संख्या कशी वाढवायची याविषयीदेखील महिला गुगल सर्च करतात. अनेक युझर्स आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या फॉलोअर्सची संख्या कशी वाढवायची आणि त्यासाठी काय करायचं, अशा प्रश्नांच्या अनुषंगानं गुगल सर्च करत असल्याचं गुगलवरच्या प्रश्नांमधून दिसून येतं.

    अभ्यास आणि अहवालांनुसार, बहुतेकशा अविवाहित तरुणींच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये एक प्रश्न निश्चितपणे समाविष्ट असतो. आजकाल अनेक तरुणी कोणाला तरी डेट (Date) करत असतात. त्यामुळे प्रियकर आपल्याशी आणि नातेसंबंधांत एकनिष्ठ आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर त्या गुगल सर्चमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. या तरुणींना अनेक वेबसाइट्सवरून जाणून घ्यायचं असतं की त्यांचा प्रियकर त्यांची फसवणूक करतोय की एकनिष्ठ आहे.

    तरुणींमध्ये मासिक पाळीच्या (Menstruation) कालावधीशी संबंधित अनेक प्रश्न दिसून येतात. त्यांच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये ही एक सामान्य बाब नेहमी दिसते. महिला गुगल सर्चच्या माध्यमातून मेन्स्ट्रुअल सायकलविषयी सविस्तर माहिती घेताना दिसतात. पीरियड्सना उशीर का होतो, त्यामागची कारणं कोणती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महिला गुगलच्या माध्यमातून सर्च करतात. काही महिलांना अनियमित पीरियड्सचा त्रास असतो. याविषयीदेखील महिला गुगलवर सर्च करतात. कारण ही गोष्ट एखाद्या आजारामुळे किंवा संसर्गामुळे होऊ शकते.

    First published:

    Tags: Google, Internet, Pregnent women