Home /News /lifestyle /

अविवाहित जोडपेही राहू शकतात लॉजवर, पोलिसांनी त्रास दिल्यास अशी करा तक्रार

अविवाहित जोडपेही राहू शकतात लॉजवर, पोलिसांनी त्रास दिल्यास अशी करा तक्रार

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील म्हणतात की, अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. अट एकच आहे, की दोघेही प्रौढ असणे आवश्यक आहे.

    मुंबई, 28 मे : जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये असाल आणि पोलिस तुमची चौकशी करण्यासाठी आले तर घाबरण्याची गरज नाही. अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. चला याविषयी अधिक जाणून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गर्ग म्हणतात की, अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की दोघेही प्रौढ असावेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या इच्छेने कोणाशीही जगण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही. याचा अर्थ असा की लग्नाशिवाय जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहत असतील तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. ज्येष्ठ वकील विनय कुमार गर्ग यांचे म्हणणे आहे की, हॉटेलमध्ये राहताना पोलिसांनी अविवाहित जोडप्याचा छळ केला किंवा अटक केली, तर ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाईल. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात हे जोडपे राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये थेट सर्वोच्च न्यायालय किंवा कलम 226 अंतर्गत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात. Menstrual Hygiene Day: पॅड, टॅम्पन किंवा कप तुमच्यासाठी आरोग्यदायी कोणतं? डॉक्टर म्हणतात.. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रार करा गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलमध्ये राहणाऱ्या अविवाहित जोडप्याला त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रार करता येईल. याशिवाय पीडित जोडप्याकडे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना गर्ग म्हणाले की, हॉटेल अविवाहित जोडप्याला विवाहित नसल्याच्या कारणावरुन थांबू शकत नाही. हॉटेलने असे केल्यास ते मुलभूत अधिकाराचे उल्लंघनही मानले जाईल. याचा अर्थ अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहता येते. हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे राहत असतील आणि छापेमारीच्या वेळी पोलिस त्यांच्याकडे आले, तर अशा जोडप्याने घाबरून जाण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार, अशा जोडप्याला त्यांचे आयकार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवावे लागेल, जेणेकरून दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नाहीत हे सिद्ध करता येईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Couple

    पुढील बातम्या