Home /News /lifestyle /

Healthy Relationship चे पाच फंडे! या गोष्टींतून कळेल तुमचं नातं किती आनंदी...

Healthy Relationship चे पाच फंडे! या गोष्टींतून कळेल तुमचं नातं किती आनंदी...

तुमचे विचार तुमच्या जोडीदाराशी जुळत असतील आणि तुम्ही त्याची काळजी करत असाल, त्याला पाठिंबा देत असाल आणि त्याला पुढे जाताना पाहण्याची इच्छा व्यक्त करत असाल तर ही तुमच्या चांगल्या नात्याची (Healthy and Good Relationship) खरी ओळख आहे.

पुढे वाचा ...
मुंबई,13 फेब्रुवारी : कोणतही नातं (Relationship) आपण प्रेम आणि विश्वासाने कायम टिकवून ठेवू शकतो. जेव्हा दोन व्यक्ती बराच काळ एकत्र राहतात तेव्हा काहींचे विचार, सवयी  (Habits) एकमेकांशी जुळत नाहीत. तर काहींचे विचार आणि सवयी एकमेकांशी जुळतात. म्हणजे तुमचे विचार तुमच्या जोडीदाराशी जुळत असतील आणि तुम्ही त्याची काळजी करत असाल, त्याला पाठिंबा देत असाल आणि त्याला पुढे जाताना पाहण्याची इच्छा व्यक्त करत असाल तर ही तुमच्या चांगल्या नात्याची खरी ओळख आहे. तुम्ही सुद्धा काही संकेतांच्या माध्यमातून आपलं नातं (Relations) किती आनंदी आणि सुंदर आहे हे ओळखू शकता. मोकळेपणाने मनातील गोष्ट बोलणे एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी मनातील प्रत्येक गोष्टी शेअर करते ही एका चांगल्या नात्याची ओळख आहे. ते आपल्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतात. मग ती गोष्टी यशाची (Success) असो किंवा अपयशाची (Failure) असो किंवा इतर काही. काही गोष्टींबाबत तुमचं मत वेगळं असू शकतं. पण असं असूनही जर तुम्ही एकमेकांना समजून घेत असाल तर तुमचं नातं खूप चांगलं आहे असं म्हणता येईल. (हे वाचा-प्राचीन भारतीय सुंदरतेची रहस्य; 'या' पाच गोष्टींनी खुलवा तुमचं सौंदर्य) पूर्णपणे विश्वास ठेवणे कोणत्याही नात्याचा पाया विश्वासाने बळकट होत असतो. जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, विश्वास कायम असेल तर तुम्ही एका चांगल्या नात्यात आहात. जर तुम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नाही, एकमेकांना फसवत नाही याचा अर्थ तुम्ही एकमेकांसोबत स्वत:ला सुरक्षित समजता. एकमेकांच्या प्रेमात पडणे एका चांगल्या नात्याची आणखी एक ओळख ही आहे की तुम्हाला एकमेकांसोबत खूप चांगले वाटते. तुम्ही एकत्र वेळ घालवण्याला महत्व देता. कदाचित यासाठी तुमच्याकडे वेळ कमी असेल. पण तुमच्याकडे जो काही वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला सोबत राहायचे असेल तर ते एका निरोगी नात्याची ओळख म्हटले जाऊ शकते. (हे वाचा-वयाच्या 23 व्या वर्षात 11 मुलं आणि म्हणे, 100 मुलांची आई व्हायचंय) एकमेकांना पाठिंबा देणे जर तुम्ही एकमेकांना प्रोत्साहित केले, एकमेकांना चांगले होण्यासाठी प्रवृत्त केले आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले तर ही चांगल्या नात्याची ओळख आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काळजी आहे आणि त्याला पुढे जाताना पाहण्याची इच्छा आहे. एकमेकांना बरोबरीची वागणूक देणे नात्यामध्ये तुम्ही आणि तुमचा जोडीदार जर तुमची काळजी करतो आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मदत करतो, तुम्ही प्रत्येक निर्णय एकत्रितपणे घेत असाल तर याचा अर्थ तुम्ही एकमेकांना समान वागणूक देता.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Love, Valentine day

पुढील बातम्या