मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का? मग तुमचं वजन वाढू शकतं!

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का? मग तुमचं वजन वाढू शकतं!

महिला आणि पुरुषांच्या वागणूकीवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे.

महिला आणि पुरुषांच्या वागणूकीवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे.

या दोन गोष्टींचा काय संबंध, असं वाटलं ना? म्हणून हे वाचा.

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: तुम्ही रिलेशनशिपमध्ये (Relationship) आहात का? मग तुमचं वजन (Weight) वाढू शकतं! या दोन गोष्टींचा काय संबंध, असं वाटलं ना? पण ऑस्ट्रेलियातल्या (Australia) क्वीन्सलँडमध्ये (Queenceland) झालेल्या एका संशोधनात असं आढळलं आहे, की रिलेशनशिपमध्ये असलात तर तुमचं वजन वाढू शकतं. हे सिद्ध करण्यासाठी 15 हजार जणांवर हे संशोधन करण्यात आलं. ही सगळी कपल्स होती.

या सगळ्या लोकांचं वजन सिंगल (Single) व्यक्तींपेक्षा 5.8 किलो जास्त असल्याचं आढळलं. या कपल्सपैकी कोणीही धूम्रपान करत नव्हतं की त्यांपैकी कोणीही जंक फूडही खात नव्हतं. त्याउपर या सर्वांच्या मद्यपानाचं प्रमाणही फार कमी होतं. असं असूनही त्या कपल्सचं वजन वाढत असल्याचं लक्षात आलं. वाढत्या वजनाचं कारण त्यांच्या आउटिंगशीही निगडित असू शकेल. कपल्स जेव्हा डेटवर जातात, तेव्हा त्यांच्याकडून जंक फूडचं सेवन केलं जातं. आरोग्यपूर्ण जीवनशैली अवलंबली जात नाही. ज्या व्यक्ती दोन वर्षं रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये वजन वाढण्याची समस्या जास्त असल्याचं लक्षात आलं.

त्याव्यतिरिक्त जी कपल्स दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र आहेत आणि खूश आहेत, ती ताण व्यवस्थापन सुलभपणे करू शकतात. कारण त्यांची स्ट्रेस-कॉर्टिसॉल लेव्हल नियंत्रणात असते. ही कपल्स अडचणी किंवा त्रासाकडे दुर्लक्ष करून एकमेकांसोबत खुशीने राहणं पसंत करतात. हेसुद्धा त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं.

हे देखील वाचा -   लग्नाळू जोडप्यांचं टेन्शन संपणार! Valentine's day च्या आधीच सुप्रीम कोर्टीने दिला प्रेमाच्या बाजूने निकाल

जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हा जाडेपणाची (Fatness) समस्या अधिक वाढते. मुलाने टाकून दिलेलं किंवा न खाल्लेलं अन्न वाया जाऊ नये म्हणून त्यांचे पालक खातात. त्यामुळेही त्यांचं वजन वाढतं.

रिलेशनशिपमध्ये राहण्याचे फायदेही असतात.

जेव्हा जोडीतील दोन्हीही व्यक्ती आरोग्याप्रति जागरूक असतात, तेव्हा त्या एकमेकांसोबत व्यायाम (Excercise) करून वजन वाढण्याची समस्या येऊच देत नाहीत. एकमेकांसोबत सकाळी चालायला जाणं, सायकलिंग करणं किंवा सायकल घेऊन वीकेंडला छोटी टूर करणं, जवळच्या किल्ल्यावर किंवा डोंगरावर ट्रेकिंग करणं असे अनेक व्यायाम कपल्सना करता येऊ शकतात. अनेक कपल्स तसं करतातही. त्यांच्याकडून सर्वांनीच प्रेरणा घ्यायला हवी. अर्थात नियमितता हादेखील या व्यायामाचा मुख्य भाग असायला हवा. कारण नियमितता नसलेल्या व्यायामाचा उपयोग होण्यापेक्षा त्रासच होऊ शकतो.

First published:

Tags: Fitness, Relationship, Relationship tips