युक्रेन, 17 फेब्रुवारी : ठरलेल्या कालावधीत कर्ज (loan) न फेडल्यास संपत्तीचा लिलाव केला जातो, हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण कधी अंडरविअरचा लिलाव झाल्याचं ऐकलं आहे का? नाही ना. किंबहुना कर्ज फेडलं नाही म्हणून अंडरविअरचा लिलाव (Underwear auction) कसा होईल? पण हे खरं आहे. असा लिलाव (auction) होतो आहे तो युक्रेनमध्ये.
अनेक लोक आपले कर्ज फेडू शकतात किंवा काही जण कर्ज घेतात आणि फरार होतात. बँकवाले कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी फेऱ्या मारत राहतात. पण युक्रेनमध्ये कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी अनोखी पद्धत सुरू केली आहे. इथं कर्ज न फेडणाऱ्यांचे कपडेही सोडले जात नाही. चक्क अंडरविअरचाही लिलाव केला जातो आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार जस्टिस मिनिस्ट्री वेबसाईटवर अंडरविअरच्या लिलावाची जाहिरात देण्यात आली आहे. याची किंंमत 19.4 hryvnia म्हणजे जवळपास 50 रुपये ठेवण्यात आली आहे. Setam या ऑनलाइन ऑक्शनअंतर्गत हा लिलाव केला जातो आहे.
हे वाचा - सामाजिक प्रतिष्ठा मोठी की स्त्री सम्मान? कोर्टाने दिले रामायण-महाभारतातले दाखले
कोरोना काळात अनेकांना फटका बसला आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यूएन रिपोर्टनुसार युक्रेनमध्ये महासाथीदरम्यान 40 टक्के लोक असे आहेत ज्यांच्या घरात कुणाची ना कुणाची नोकरी गेली आहे. देशात मंदी आहे. युक्रेनमध्ये कर्ज न फेडणाऱ्या लोकांची संख्या भरमसाठ वाढली आहे.
लोक कर्ज फेडू शकत नाही, पण बँका मग अशा पद्धतीनं कर्ज वसूल करत आहेत. रिपोर्टनुसार इथं कर्ज न फेडणाऱ्यांच्या गुरांचाही लिलाव केला जातो आहे. गेल्या वर्षी तर चक्क दोन कुत्र्यांच्याही लिलावाची बातमी देण्यात आली होती.
हे वाचा - कसं शक्य आहे? तिच्या काखेतून निघतं दूध; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही
युक्रेनंध्ये 2015 पासून Setam सुरू करण्यात आलं. या अंतर्गत कर्जदाराची मालमत्ता विकली जाते. जे लोक कर्ज फेडत नाहीत त्यांंचं काही सामान विकलं जातं. तर काही सामान अनाथ आश्रम, शाळांमध्येही दान केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.