जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कसं शक्य आहे? तिच्या काखेतून निघतं दूध; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

कसं शक्य आहे? तिच्या काखेतून निघतं दूध; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

कसं शक्य आहे? तिच्या काखेतून निघतं दूध; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

महिलेनं तिच्या काखेतून दूध येत असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मिनास्टोना, 16 फेब्रुवारी : ब्रेस्टप्रमाणेच (breast milk) काखेतूनही दूध (milk from armpit) येत असल्याचं सांगितलं तर कुणालाही आश्चर्यच वाटेल. किंबहुना कुणाचा यावर विश्वासच बसणार नाही. मात्र एका महिलेच्या काखेतून चक्क असं दूध येत आहे. तिनं फक्त हे बोलून दाखवलं नाही तर सिद्धही करून दाखवलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. तीन मुलांची आई असलेली मिनास्टोनातील (Minnesota) ही महिला.  तिनं टिकटॉक व्हिडीओत (TikTok video) आपल्या काखेतून दूध निघत असल्याचं दाखवलं आहे. टिकटॉक युझर @ollieoooop  हिनं तिच्याकडे असलेली ही क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

याचा व्हिडीओही तिनं शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता तिनं आपल्या काखेतून दूध काढून दाखवलं. हे वाचा -  प्रेमासाठी वाट्टेल ते! 3 महिन्यांसाठी कपलनं स्वतःला अडकवलं एकाच बेडीत याबाबत सांगताना ती म्हणाली, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांना pittiesहोतात. म्हणजे जेव्हा ब्रेस्ट मिल्कमुळे ब्रेस्ट टिश्यू जड होतात तेव्हा काखेत एक गाठ किंवा सूज येते. माझ्या शरीरात जो मला हा बदल जाणवला तसा कुणासोबत झाला असावा याबाबत मला माहिती नाही. पण यामुळे तिच्या काखेतून दूध येतं. हे वाचा -  3 महिन्यांपूर्वी तिने सुरू केलं ऑलनाइन Organic Store, महिन्याला कमावते 1 लाख जानेवारीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला पण आता तो व्हायरल होतो आहे आणि मग अशी क्षमता असणारी ती एकटी नाही तर अशा बऱ्याच महिला असल्याचं समजलं. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना इतर महिलांनी आपला किंवा त्यांनी पाहिलेला असाच अनुभव शेअर केला आहे.  डेली मेलच्या वृत्तानुसार एका महिलेनं सांगितलं की, जेव्हा ब्रेस्टमध्ये मिल्क जास्त होतं, तेव्हा ती असं करू शकते. तर एकानं आपल्या मैत्रिणीचा अनुभव सांगितला आहे. जेव्हा त्या मैत्रिणीला रुग्णालयात मुलगा झाला तेव्हादेखील तिच्यासोबत असं होत होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात