मराठी बातम्या /बातम्या /देश /

MJ Akbar Case: सामाजिक प्रतिष्ठा मोठी की स्त्रीचा आत्मसन्मान? रामायण-महाभारतातले दाखले देत कोर्टाने दिला ऐतिहासिक निकाल

MJ Akbar Case: सामाजिक प्रतिष्ठा मोठी की स्त्रीचा आत्मसन्मान? रामायण-महाभारतातले दाखले देत कोर्टाने दिला ऐतिहासिक निकाल

MeToo चळवळीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री MJ Akbar यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करणाऱ्या प्रिया रामानी यांच्यावरच अकबर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. पण हा निकाल अकबर यांच्या विरोधात गेला आहे. का ऐतिहासिक ठरणार हा निर्णय?

MeToo चळवळीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री MJ Akbar यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करणाऱ्या प्रिया रामानी यांच्यावरच अकबर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. पण हा निकाल अकबर यांच्या विरोधात गेला आहे. का ऐतिहासिक ठरणार हा निर्णय?

MeToo चळवळीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री MJ Akbar यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करणाऱ्या प्रिया रामानी यांच्यावरच अकबर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. पण हा निकाल अकबर यांच्या विरोधात गेला आहे. का ऐतिहासिक ठरणार हा निर्णय?

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : पत्रकार प्रिया रामानी (Priya Ramani) यांच्याविरुद्ध माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर (M J Akbar) यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला न्यायालयानं फेटाळला आहे. या खटल्याचा निकाल ऐतिहासिक मानला जातो. स्त्रीनं तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कधी बोलावं याला काही वेळ नसते, असंच या निकालातून कोर्टाने स्पष्ट केलं आहे. यावेळी स्त्रीचा आत्मसन्मान, तिच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्याची प्रक्रिया यावर खूप महत्त्वाचं भाष्य न्यायालयानं केलं आहे. पत्रकार प्रिया रमानी (woman journalist Priya Ramani) यांनी माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर यांच्यावर 2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान लैंगिक शोषण केल्याचा (sexual harassment) गंभीर आरोप लावला होता. यावर अकबर यांनी रमानी यांच्यावरच अब्रूनुकसानीचा दावा (defamation suit) दाखल केला होता. आपल्या खटल्यासाठी तब्बल 97 वकिलांची फौज अकबर यांनी लावली होती. प्रिया रामानी यांनी दावा केल्याप्रमाणे अकबर यांनी 1993 मध्ये त्यांचा लैगिंक छळ (Sexual Harrasment) केला होता. प्रिया याबद्दल पहिल्यांदा जाहिरपणे बोलल्या 2018 मध्ये जेव्हा MeToo चळवळ ऐन भरात होती. हाच धागा पकडून अकबर यांनी त्यांच्याविरोधात आपल्याला मुद्दाम बदनाम करण्याचा हा कट असल्याचं सांगत प्रिया यांच्याविरोधात दावा ठोकला होता. याबाबतचा निकाल देताना रॉउज एवेन्यू न्यायालयानं (Rouse avenue court) अकबर यांचा दावा पूर्णतः फेटाळून लावला आहे. महिला पत्रकार रमानी यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसल्याचे सांगणारा ऐतिहासिक निकाल कोर्टानं दिला आहे. एकूण चार महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.

हे वाचा -  महिला पत्रकाराला मोठा दिलासा; एमजे अकबर यांचा मानहानीचा खटला कोर्टाने फेटाळला

या निकालाला ऐतिहासिक म्हणलं जातं आहे, कारण या निकालाच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं प्राचीन आणि आधुनिक काळातलं समाजमन, सामाजिक सांस्कृतिक वास्तव आणि त्याचा एखाद्या महिलेच्या लैंगिक शोषणाबाबत बोलणं वा शांत राहणं यांच्यावर पडणारा प्रभाव याबाबत कळीचं भाष्य केलं आहे. अगदी भारतीय संस्कृतीत आदराचं स्थान असलेल्या रामायण-महाभारतातील उदाहरणंही न्यायालयानं दिली. न्यायालयानं रामायण महाभारतासारख्या (Ramayana and Mahabharta) भारतीय पौराणिक ग्रंथांतील (Indian Mythology) औचित्यपूर्ण दाखलेही आवर्जून दिले आहेत. याकाळात महिलांची अवस्था, सामाजिक-सांस्कृतिक स्थान काय होतं यावरसुद्धा पुराणकथाद्वारे प्रकाश टाकला आहे. स्त्रीसम्मान किती महत्त्वाचा हे सांगणारे ग्रंथ जिथे लिहिले गेले तिथे सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा स्त्री सम्मानापेक्षा मोठा ठरू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयानं निकाल देताना म्हटलं, राजकन्या असलेल्या सीतेचं रावणानं अपहरण केलं होतं. तेव्हा जटायू पक्षी (Jatayu) सीतेला वाचवायला आला होता. याशिवाय रामायणातील अजून एक प्रसंग न्यायालयात उद्धृत केला गेला. तो असा, की सीतेचा दीर असलेल्या लक्ष्मणाला जेव्हा सीतेचं वर्णन करायला सांगितलं गेलं, तेव्हा लक्ष्मण उद्गारला, की सीतामातेच्या पायांशिवाय आपली नजर इतर कुठं पोचलीच नाही. न्यायालयानं वर्तमानातील महिलांच्या मानवी आणि घटनात्मक हक्क-अधिकारांचा स्पष्टपणे पुरस्कार केला. न्यायालय म्हणालं, की भारतीय संविधानानं (Indian Constitution) दिलेला जीविताचा अधिकार आणि समानतेचा अधिकार महिलांना मिळालेला आहे. कुठल्याही महिलेला तिला आवडलेल्या आणि योग्य वाटलेल्या मंचावर आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. याशिवाय हा सगळा शोषणाचा प्रकार रमानी यांच्यासोबत घडला तेव्हा आजघडीला अस्तित्वात असलेल्या विशाखा गाईडलाईन्सही (Vishakha guidelines)  नव्हत्या. अर्थात, आपल्या समाजाला अजून हे समजायला थोडा काळ जावा लागेल, की अनेकदा पीडित व्यक्ती तिच्यावर झालेल्या मानसिक-भावनिक आघातांमुळं वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायाबाबत ब्रसुद्धा उच्चारू शकत नाही. पण अन्यायाविरुद्ध न बोलता शांत बसली म्हणून तिला शिक्षा केली जाऊ शकत नाही. दशकभरानंतर किंवा त्याहून जास्त काळ गेल्यावरही महिला झालेल्या शोषणाबाबत बोलूच शकते. विशेष म्हणजे, तिचं हे बोलणं म्हणजे कुणाची अब्रूनुकसानी झाली असं म्हणता येणार नाही. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था आजच्या आधुनिक काळातही अशी आहे, की अनेकदा महिला आपलीच बदनामी होईल या भीतीनं अशा प्रकरणांमध्ये समोर येत तक्रार देणं टाळतात. या सामाजिक वास्तवावरही या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयानं बोट ठेवलं. गजाला वहाब यांनी याच भीतीपोटी अकबर यांच्याविरूद्ध तक्रार केली नाही. सोबत न्यायालयानं हेही म्हटलं, की लैंगिक शोषणाबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी जी एक यंत्रणा लागते ती आपल्या देशात पुरेशी मजबूत आणि आश्वासक नाही. भारतीय महिलांना आज समानतेशिवाय दुसरंतिसरं काही नको आहे. न्यायालय म्हणालं, की मोठी सामाजिक प्रतिष्ठा मिरवणारा व्यक्तीही शोषक असू शकतो. रमानी यांनीही न्यायालयात आपली बाजू मांडताना विधान केलं, की अकबर हे काही ते दावा करतात तसे नीतिमान व्यक्ती नाहीत. त्यांच्यावर इतरही अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. सोबतच एखादी विवाहित व्यक्ती कुणासोबत त्यांच्या संमतीनंसुद्धा संबंध ठेवत असेल तर त्या व्यक्तीला नीतिमान कसं मानलं जाऊ शकेल? न्यायालयानं याकडंही लक्ष वेधलं, की लैंगिक शोषण हे बहुतेकदा बंद दरवाज्याआड होत असतं. लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये बहुतेकदा त्याचे शारीरिक पैलूच जास्त चर्चेत येतात, न्यायालयानं मात्र अशा शोषणातून व्यक्तीचं होणारं मानसिक भावनिक पातळीवरचं अदृश्य नुकसानही यानिमित्तानं उजेडात आणलं. न्यायालय म्हणालं, 'लैंगिक शोषण थेट व्यक्तीचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यांना ठेच पोचवतं. प्रतिष्ठेचा अधिकार हा आत्मसन्मानाच्या अधिकाराची किंमत मोजून जपला जाऊ शकत नाही. समाजाला आता लैंगिक शोषणाचे एखाद्या व्यक्तीवर नक्की कुठले आणि कसे परिणाम होतात याबाबत साक्षर होण्याची गरज आहे. संकलन - शर्मिष्ठा भोसले
First published:

Tags: M j akbar, Priya ramani, Sexual harassment

पुढील बातम्या