जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हा असा कसला आजार! हसता हसताच बेशुद्ध होते ही महिला

हा असा कसला आजार! हसता हसताच बेशुद्ध होते ही महिला

हा असा कसला आजार! हसता हसताच बेशुद्ध होते ही महिला

हसणं (Laugh) आरोग्यासाठी चांगलं असल्याचं म्हटलं जातं पण या महिलेसाठी मात्र ती एक गंभीर समस्या बनली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 29 एप्रिल : हसण्याने (Laugh) आरोग्य चांगलं राहतं असं म्हटलं जातं. कित्येक लोक तर लाफ्टर थेरेपी घेतानाही दिसतात. मात्र एखाद्यासाठी हसणंच घातक ठरत असेल तर. यूकेतील महिलेला अशी गंभीर समस्या आहे. ती कधीच हसू शकत नाही आणि हसली ती हसता हसता बेशुद्ध (Woman lose control while laughing) होतं.  हसता हसता पोटात दुखणं ठीक आहे, पण हसता हसता बेशुद्ध होणं. ऐकूनच तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना. या महिलेच्या बाबती नेमकं असं का होतं, जाणून घेऊयात. ब्रिटनच्या बर्मिंगघममध्ये राहणारी बेला किलमार्टिन. दोन गंभीर आजारांचा सामना करते आहे. ज्यामुळे तिला प्रचंड झोप येते आणि हसता हसता तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध होते. तिला असलेले हे आजार म्हणजे नार्कोलेप्सी आणि केटाप्लेक्सी. हे वाचा -  तज्ज्ञांनी केलं Alert! तातडीने लस घ्या; अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार नार्कोलेप्सी हा असा आजार आहे, ज्यामुळे खूप झोप येते. तर केटाप्लेक्सी हा असा आजार आहे, ज्यात भावना तीव्र होऊन शरीरावरील नियंत्रण सुटतं. बेलाच्या बाबतीत ही भावना म्हणजे हसणं. बेला जेव्हा हसते तेव्हा तिच्या शरीरावर नियंत्रण राहत नाही. हसता हसताच ती बेशुद्ध होते. हसल्याने तिचं पूर्ण शरीर शटडाऊन मोडमध्ये जातं. हे वाचा -  कोरोनामुळे वास घेण्याची क्षमता गेल्यानंतर काय करावं? तज्ज्ञांनी सांगितला उपाय तिने स्विमिंगपूलमधील आपला एक किस्सा सांगितला. स्विमिंग पूलमध्ये असताना ती हसायला लागली. त्यावेळी ती बेशुद्ध झाली आणि पाण्यात बुडू लागली. त्यामुळे अशा ठिकाणी तर ती आता हसणं टाळते. बेलाने सांगितलं, स्नायूंवरील नियंत्रण सुटतं. पाय कमजोर पडू लागतात आणि नियंत्रण बिघडतं. मला आजूबाजूचं सर्व समजतं पण शरीरावर नियंत्रण नसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात