मुंबई, 29 एप्रिल : कोविड-19 (Covid-19)च्या लक्षणांमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. मात्र कोरोना झाल्यास वास घेण्याची क्षमता जाणं (Loss of Smell) हे लक्षण (Coronavirus symptoms) अजूनही आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर त्याची लक्षणं (Symptoms of coronavirus) दिसत नाही. मात्र वास घेण्याची पूर्ण क्षमता यायला बराच वेळ लागतो. वास परत येण्यास कित्येक महिनेही लागू शकतात. काही तज्ज्ञ ही क्षमता परत मिळवण्यासाठी स्ट्राइडचा सल्ला देतात. पण ही क्षमता परत मिळवण्याचा हा पहिला मार्ग नव्हे असं म्हणत संशोधकांनी आता सोपा उपाय सांगितला आहे.
तज्ज्ञांच्या मते वारंवार एखादा सुगंध (Sniffing Scent) घेत राहायला हवा. दिवसातून दोन वेळा चार वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध घेतल्यास कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वास घेण्याची क्षमता लवकर परत येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितलं. याबद्दलचा सविस्तर अभ्यास इंटरनॅशलन फोरम ऑफ अलर्जी अँड रिनोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.
कोर्टिसोस्ट्रॉइड्स हा वास घेण्याची क्षमता परत मिळवण्यासाठी वापरण्यात येणारा पहिला पर्याय कधीच नसावा, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कोर्टिसोस्ट्रॉइड्ससारख्या औषधांचा वापर नाक जळल्यास करायला सांगतात. मात्र कोरोनामुळे वास घेण्याची क्षमता कायमस्वरूपी जात नाही. त्यामुळे हे औषध त्यावर प्रभावी ठरण्याची शक्यता कमी आहे. नाकाला सुगंध घेऊन वासाची सवय लावण्याचा पर्याय हा योग्य पर्याय असल्याचं म्हटलं गेलं आहे. याचे कोणतेच दुष्परिणाम नाही. त्यामुळे सध्या वास घेण्याची क्षमता परत मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला हा एकमेव योग्य पर्याय आहे.
हे वाचा - रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही; घरच्या घरीच कोरोना रुग्णांना बरं करणार औषध
कोविड-19 मुळे वास गेल्यानंतर वास घेण्याचं प्रशिक्षण देणं आणि स्ट्रॉइडचा वापर करणं या दोघांची तुलना करणं कठीण आहे. कारण याबाबत आतापर्यंत कोणताच अभ्यास केला गेला नाही. मात्र गेल्या काही काळापासून वास घेण्याचं प्रशिक्षण देणं ही संकल्पना चलनात आहे.
2020 मध्ये झालेल्या एका अभ्यासात वास घेण्याची क्षमता गेल्यानंतर वास घेण्याचं प्रशिक्षण देणं हा सर्वात यशस्वी ठरलेला पर्याय होता. सध्या 60 टक्के रुग्णांमध्ये वास न घेता येणं हे लक्षणआढळतं. त्यापैकी 10 टक्के लोकांना ती क्रिया परत करता येण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे वास घेण्याचं प्रशिक्षण देणं हा पर्याय वापरण्याची गरज आहे.
हे वाचा - शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास पॅनिक होऊ नका! घरीच करा 4 पद्धतींचा अवलंब
2021 मध्ये केलेल्या एका संशोधनात हजार पेक्षा जास्त रुग्णांना या प्रशिक्षणाचा 95 टक्के फायदा झाला. या रुग्णांनी सहा महिन्यांतच वास घेण्याची क्षमता परत मिळवली. या लोकांना रोज दोन प्रशिक्षण सत्रांत सहभागी होण्याचा सल्ला दिला गेला होता. सध्या 12आठवडे म्हणजेच तीन महिन्यांचं सुगंध घेण्याचं प्रशिक्षण नाकाला देण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus