ब्रिटन, 04 जून : तसा उन्हाचा त्रास बहुतेकांना होतो. काही जण उन्हात अगदी लालभडक होतात, तर काही जणांची त्वचा उन्हामुळे काळवंडते. उन्हामुळे त्वचेवर सनबर्न (Sunburn) होतं. पण हा त्रास वारंवार उन्हात बाहेर पडल्याने होतो. पण एका महिलेच्या चेहऱ्याची अवस्था फक्त एक दिवस उन्हात गेल्याने इतकी भयंकर झाली आहे, की तुम्ही कल्पनाही केली नसेल. उन्हामुळे चेहऱ्याची अशी अवस्था कदाचित तुम्ही कधीच पाहिली नसेल.
यूकेच्या साऊथ वेल्समध्ये राहणारी 26 वर्षांची लॉरेन स्टेसी हॉलिडेवर होती. त्यावेळी फक्त एक दिवस उन्हात गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आपला चेहरा पाहूनच धक्का बसला. तिने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली.
द मिररच्या रिपोर्टनुसार लॉरेननं सांगितलं, "हॉलिडेवर गेल्यानंतर एक दिवस बाहेर फिरले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर माझा चेहरा सूजल्यासारखा वाटत होता. माझे डोळेसुद्धा उघडत नव्हते. मी माझे डोळे उघडण्याचा कितीतरी प्रयत्न केला. पण काही केल्या डोळे उघडेनाच. अखेर मी माझ्या रूममेटला विचारलं की माझा चेहरा कसा दिसतो आहे, नॉर्मल आहे का?"
"माझी रूममेट तर मला पाहून घाबरलीच. ती म्हणाली तू स्वतःच आरशात तुझा चेहरा बघ. जेव्हा मी आरशात पाहिलं. पण मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पण माझा चेहरा सुजल्यासारखा दिसला. माझा चेहरा इतका खराब झाला होता की मी एखाद्या राक्षसासारखी दिसत होते", असं लॉरेन म्हणाली.
हे वाचा - VIDEO - सीट बेल्ट लावायला सांगताच आला राग, प्रवाशाने तोडले एअर हॉस्टेसचे दात
आपली अशी अवस्था पाहून तिला धक्काच बसला. आपल्याला काय झालं आहे, याची चिंता तिला वाटू लागली. ती लगेच डॉक्टरांकडे गेली.
लॉरेनला सन पॉइजिनिंग झालं होतं. डॉक्टरांनी तिला सूर्यकिरणांमुळे अॅलर्जीक रिअॅक्शन झाल्याचं सांगितलं. ज्यांच्या त्वचेला सूर्यकिरणं सहन होत नाही, त्यांना अशा पद्धतीने सन अॅलर्जी होऊ शकते. उन्हामुळे होणार हा ंगंभीर असा त्रास आहे. यामुळे चेहरा सूजतो आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी उन्हात न जाण्याचा आणि उन्हात गेलं तर सनस्क्रिन लावण्याचा सल्ला दिला जातो.
मी सुट्टीत फिरायला गेले होते. तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरावर सनस्क्रिन लावलं. पण चेहऱ्यावर ही क्रिम लावयाला विसरले. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली, असं लॉरेन म्हणाली.
हे वाचा - 25 वर्षाच्या हलिमानं एकसोबतच दिला 9 बाळांना जन्म, एका महिन्यानंतर आहे अशी अवस्था
तिचा चेहरा इतका बिघडला होता की तो फक्त दिसायलाच भयंकर नव्हता तर जेव्हा ती सुट्टीवरून घरी परतली तेव्हा विमानतळावर डिजीटल फेस सॉफ्टवेअरमध्ये तिचा चेहराही ओळखला जात नव्हता. सुदैवाने औषध घेतल्यानंतर पाच दिवसांत आपल्या चेहऱ्याची सूज उतरल्याचं लॉरेननं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.