दिल्ली, 22 जून : जगात किती वेगळ्या प्रकारचे दिवस साजरे केले जातात याची तुम्हाला कल्पनाही नसेल. आपल्याला ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’, ‘रोज डे’ हे सहजपणे लक्षात राहतात. जगात असे का ‘डे’ साजरे केले जातात ज्याच्याबद्दल आपल्या देशात बोलायला देखील थोडासा अवघडलेपणा (Difficulty) जाणवतो.
आज ‘नो पॅन्टी डे’ (No Panty Day) आहे. ‘नो पँटी डे’ म्हणजे दिवसभर पॅन्टी न घालता एक मोकळा ढाकळा अनुभव घेणं.
थोडी कल्पना करून बघाच, समजा तुम्ही दिवसभर अंडरगारमेंट (Undergarment) घातलेलं नाहीये. कसं वाटतंय? दिवसभर अंडरगारमेंट न घालता वावरण्यात जो मोकळेपणाचा आनंद मिळेल तो फक्त स्त्रियाच समजू शकतात. हाच अनुभव एक दिवसासाठी ‘नो पॅन्टी डे’च्या माध्यमातून घेता येतो. 22 जूनला नो पॅन्टी डे साजरा केला जातो.
(National Kiss Day: 'किस'विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?)
‘नॅशनल नो पॅन्टी डे’चा इतिहास
‘नॅशनल नो पॅन्टी डेच्या मागे स्वातंत्र्याचीही संकल्पना आहे. हा दिवस केव्हा आणि कधी अस्तित्वात आला याची माहिती अजूनही तितकी स्पष्ट नाही. पण, साधारणपणे 1980च्या दशकामध्ये याची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं. महिलांना स्वातंत्र्याची जाणीव होणं आणि काही ठराविक जुनाट मुल्यांना विरोध करणं. हा यामागचा उद्देश असावा.
(तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच)
बाराव्या शतकामध्ये पॅन्टीचा वापर सुरू झाल्याचे दाखले आहेत. मात्र, चौदाव्या शतकाचा विचार केला तर कपड्यांच्या आत अंडरगारमेंट न घालण्यास प्राधान्य दिलं जात होतं असंही लक्षात येत. अठराव्या शतकामध्ये मात्र पॅन्टीने लोकप्रियता मिळवली हळूहळू पॅन्टीचे प्रकार येऊ लागले.
ज्यामध्ये आकर्षक डिझाईन्स, आकार असलेली पॅन्टी वापरात आली. काही बदल समाज लवकर स्विकारत नाही. अंडरगारमेंट न घालता घराबाहेर पडणं लोकांना तितकं पचनी पडतही नाही. मात्र, आजच्या काळामध्ये महिलांना आपल्या स्वातंत्र अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
(अगदी सहज ओळखा बेसन पिठातली भेसळ; ही आहे सोपी ट्रिक)
स्त्री आणि पुरूष अंतरवस्त्रांच्या बावतीत स्वच्छतेला जास्त महत्व देतात. कोणतेही कपडे घालताना आपल्या खाजगी भागाला झाकण्यासाठी, सुरक्षेसाठी अंतरवस्त्र घालतात.पण, काहीवेळा महिलांना अंतरवस्त्रने किंवा पॅन्टी दररोज वापरल्याने जो त्रास होतो. तो केवळ महिलाच समजू शकतात. त्यामुळेच या दिवसाच्या निमित्ताने त्यावरही चर्चा होणं अपेक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Women