मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तब्बल 3 कोटी रुपयांना आहे हे छोटंसं घर; फक्त बाथरूम पाहूनच ग्राहक खरेदीसाठी तयार

तब्बल 3 कोटी रुपयांना आहे हे छोटंसं घर; फक्त बाथरूम पाहूनच ग्राहक खरेदीसाठी तयार

(फोटो सौजन्य -Triangle News/Hunters)

(फोटो सौजन्य -Triangle News/Hunters)

कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सोयीसुविधा कशी देता येईल यासाठी हे घर उत्तम नमुना आहे.

लंडन, 26 डिसेंबर : अनेक जण मालमत्तेमध्ये (Property Investment) पैशांची गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. जमीन, शेती, दुकान आदी मालमत्ता हा गुंतवणुकीचा (Investment options) एक उत्तम मार्ग असल्याचं म्हटलं जातं. अशा बाबी खरेदी करताना विविध गोष्टींची काळजी घेतली जाते. गुंतवणूक करताना मोठी जागा, इमारती किंवा अशी मालमत्ता खरेदी करण्यास अनेक जण पसंती दर्शवतात. त्यांची किंमत काळानुसार वाढत जाते. ही गुंतवणूक फायदेशीर ठरते. सध्या अशीच एक मालमत्ता आहे, जिची किंमत कोटींच्या घरामध्ये आहे. हे एक छोटंसं बॉक्ससारखं (Small House On Sale) दिसणारं घर आहे. हे ब्रिटनमधलं (Britain Tiny House) सर्वांत लहान घर असल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रिटनमधलं हे घर अगदी छोटंसं आहे; पण या घराची किंमत कोटींमध्ये आहे. आता एवढ्या छोट्या घराची किंमत कोट्यवधी रुपये कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; पण यामागे एक विशेष कारण आहे. या घराला एक खास इतिहास आहे. यॉर्कशायरमध्ये बांधलेल्या या घरामध्ये शाही पाहुणे राहून गेले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक घराची किंमत बाजारात सुमारे तीन कोटी रुपये एवढी आहे. हे घर खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.

हे वाचा - ना भूस्खलनात कोसळत, ना वणव्यात पेटत; जगातील सर्वात मजबूत झाड

हे घर अगदी छोट्याशा बॉक्ससारखं आहे. या घरात एक स्वयंपाकघरदेखील आहे. ते तळघरात बांधलेलं आहे; मात्र या घरातलं बाथरूम अतिशय पॉश पद्धतीने बनवण्यात आलं आहे.

हे घर नॉर्थ यॉर्कशायरमधल्या ग्रिमस्टोन पार्क इस्टेटमध्ये आहे. 19व्या शतकात या घरामध्ये शाही घराण्यातल्या अनेक सदस्यांनी वास्तव्य केलेलं आहे. त्यामुळेच याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या घराच्या मालकांनी इथे अनेक वर्षं वास्तव्य केलं आहे; पण आता त्यांना याची विक्री (Georgian House On Sale) करायची आहे. ब्रिटिश राजघराण्यातल्या व्यक्ती राहून गेल्या असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

हे वाचा - जगातला पहिला हवाई स्विमिंग पूल पडला बंद, वीजेचं बिल पाहून मालकाचे डोळे पांढरे

या छोट्याशा घराच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झाल्यास, हे फक्त 10 फूट 5 इंच बाय 8 फूट 6 इंच आकाराचं आहे. अगदी कमीत-कमी जागेत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घराची रचना अगदी सुरेख पद्धतीने केली आहे. तसंच या घराला तळघरसुद्धा आहे. वळणदार अशा जिन्याने तळघर जोडलं गेलेलं आहे. या घरात ऑलिव्ह ग्रीन वुडचा वापर करण्यात आला आहे.

(फोटो सौजन्य -Triangle News/Hunters)

(फोटो सौजन्य -Triangle News/Hunters)

जिन्यावरून तळघरात गेल्यानंतर तुम्हाला एक सुंदर स्वयंपाकघर आणि बाथरूम पाहायला मिळेल. खास बाब म्हणजे, या घराचं बाथरूम खूपच पॉश आहे. खरं तर या बाथरूममुळेच अनेकांनी हे घर खरेदी करण्याची इच्छा दर्शवली आहे.

First published:

Tags: Home dec, Lifestyle