मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जगातला पहिला हवाई स्विमिंग पूल पडला बंद, वीजेचं बिल पाहून मालकाचे डोळे पांढरे

जगातला पहिला हवाई स्विमिंग पूल पडला बंद, वीजेचं बिल पाहून मालकाचे डोळे पांढरे

जगातील पहिला हवाई स्विमिंग पूल म्हणून गाजलेला प्रयोग अखेर बंद करण्याचा निर्णय त्याच्या मालकांनी घेतला आहे.

जगातील पहिला हवाई स्विमिंग पूल म्हणून गाजलेला प्रयोग अखेर बंद करण्याचा निर्णय त्याच्या मालकांनी घेतला आहे.

जगातील पहिला हवाई स्विमिंग पूल म्हणून गाजलेला प्रयोग अखेर बंद करण्याचा निर्णय त्याच्या मालकांनी घेतला आहे.

लंडन, 25 डिसेंबर: मोठा गाजावाजा करून तयार करण्यात आलेला जगातील पहिला हवाई स्विमिंग (Air Swimming Pool) पूल बंद (Closed) पडला आहे. हवाई स्विमिंग पूल हा जगातील एक अनोखा प्रयोग म्हणून गाजला होता. हवेत पोहता येण्याचा (Swimming in air) अनुभव घेता यावा, यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. मात्र यासाठी येत असलेलं वीजेचं अव्वाच्या सव्वा बिल (Heavy electricity bill) पाहून मालकाला हा पूल चालवणं परवडत नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा होता पूल

लंडनच्या साऊथ बँकमध्ये जगातील पहिला हवाई स्विमिंग पूल सुरू करण्यात आला होता. लोकांना हा प्रयोग कमालीचा आवडला होता आणि त्याकडे पर्यटक आकर्षित होऊ लागले होते. 8 फूट लांब आणि 115 फूट उंचीवर हा पूल बांधण्यात आला होता. लंडनमधील सर्वात लॅव्हिश भागात हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा खर्च येत असे, त्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वीजेचं बिल.

एवढं आलं बिल

विजेच्या या बिलानं पुलाच्या मालकाला हैराण केलं आहे. या पुलातील पाणी गरम करण्यासाठी एका महिन्याचं वीजेचं बिल येतं 1 कोटी 51 लाख रुपये. लंडनमध्ये थंडी असल्यामुळे या पुलात गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. हे पाणी सतत गरम ठेवण्यासाठी प्रचंड वीज खर्च होत असते.

हे वाचा - अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणाला राज्य सरकारने परवानगी नाकारली?

खर्च करूनही ग्राहकांची तक्रार

वीजेसाठी एवढा प्रचंड खर्च करूनदेखील ग्राहक पाणी थंड असल्याची तक्रार करत असल्याचा अनुभव आहे. एकीकडे वीजेचा खर्च होत आहे, तर दुसरीकडे ग्राहक थंड पाणी असल्याची तक्रार करत खराब रिव्ह्यू देत असल्यामुळे आपल्या व्यवसायावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचा दावा हा पूल चालवणाऱ्या मालकाने केला आहे. हा पूल चालवण्यासाठी येणारा दैनंदिन 45 हजार 500 रुपयांचा खर्च परवडत नसल्याचं मालकानं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Electricity bill, London