मुंबई, 23 डिसेंबर : अनेक घरांमध्ये लाकडांपासून (Tree) तयार केलेल्या विविध वस्तू पाहायला मिळतात. प्रत्येक घरात लाकडी खुर्च्या, टेबल, पलंग हे असतेच. काही जण खास सुताराकडून हे करून घेतात. तर काही जण दुकानातून रेडिमेड विकत घेतात. या वस्तू करवून घेताना चांगले लाकूड वापरले गेले आहे, याची खात्री आपण करून घेतो. कारण, लाकूड चांगलं असल्यास या वस्तू दीर्घकाळ टिकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मजबूत लाकूड (Stongest Tree) असलेल्या एका झाडाविषयी सांगणार आहोत. विशेष म्हणजे, हे झाड भूस्खलनात सुद्धा कोसळत नाही. तसेच जंगलात लागणाऱ्या वणव्याचाही या झाडावर काही परिणाम होत नाही. अशा या अनोख्या झाडाचे नाव ब्लॅकवूड (Blackwood) आहे. ब्लॅकवूड झाड हे सर्वात दुर्मिळ झाडांपैकी एक आहे. या झाडांची उंची जवळजवळ 40 फूट असते. तर ते 1.5 मीटर रुंद असते. कठीण परिस्थितीत या झाडाची उंची फक्त 10 मीटरपर्यंत वाढते. हे झाड दुष्काळ, ओली माती आणि समुद्रतटावरील खारट वारेही सहन करू शकतं. ब्लॅकवूड हे खूप लोकप्रिय आहे. कारण, याचे लाकूड टिकाऊ आणि चमकदार असतं. उच्च दर्जाचं आलिशान फर्निचर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या लाकडापासून बनवलेले फर्निचर दीर्घकाळ टिकतं. या लाकडाचा उपयोग हा बोटी, वाद्ये आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. हे लाकूड तब्बल 150 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतं. ही झाडं दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियापासून उत्तर क्वीन्सलँडपर्यंत पाहायला मिळतात. टीव्ही 9 हिंदी च्या रिपोर्टनुसार हे दावे द कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात मेलबर्न विद्यापीठातील संशोधक ग्रेगरी मूर यांनी केले आहेत. ते म्हणाले की, लॉकडाऊनंतर यंदाच्या ख्रिसमससाठी आम्ही कुटुंबीय एकत्र येत आहोत. गेल्या चार पिढ्यांपासून वापरात असलेल्या आमच्या घरातील डायनिंग टेबलवर आम्ही एकत्र जेवायला बसू. हा डायनिंग टेबल फार मोठा आणि जड आहे. 1880 च्या दशकात माझे पणजोबा याचा वापर करत. आमच्या घरातील प्रत्येक कार्यात या टेबलचा वापर होते. हा टेबल फक्त ब्लॅकवुडपासून बनवण्यात आला आहे. तसेच ब्लॅकवुड झाडाविषयी त्यांनी सांगितले की, या झाडावर हिवाळा संपल्यानंतर हलकी पिवळी फुलं येतात आणि ती उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत उत्तम असतात. तर झाडाच्या फाद्यांवर दोन्ही बाजूला ख्रिसमस ट्रीसारखी छोटी हिरवी पानं असतात. हे वाचा - ‘हे’ 2 देश वगळता इतर कोणत्याच देशाच्या राष्ट्रध्वजात नसतो जांभळा रंग ब्लॅकवुडची विशेष बाब म्हणजे, हे बुरशीजन्य संसर्गाचा प्रतिकार करते. जसे की, फाइटोफ्थोरा और फुसैरियम प्रजाती, ज्या काही बॅकिया आणि युकेलिप्टसला नष्ट करतात. या झाडाची प्रतिकाराची कारणे अस्पष्ट आहेत. पण, बाभळीच्या झाडाप्रमाणे या झाडाच्या मुळापासून निघणारे रसायन रोगजनकांची वाढ कमी करते, असा अंदाज आहे. ब्लॅकवुडच्या अर्काचा वापर वेदनाशामक म्हणूनही केला जातो. ब्लॅकवूड झाडाचे लाकूड काळे असते. यामागे एक कारण आहे, ते म्हणजे, या झाडांमध्ये टॅनिन 20% पर्यंत असते. हे रसायन आपल्याला चहा आणि कॉफीमुळे पडलेल्या डागांमध्ये पाहायला मिळते. हे टॅनिन स्थानिक लोकांसाठी उपयुक्त आहे. तर हे मासे आणि वाळवीसाठी विषारी असते. या झाडाच्या सालीपासून तयार केलेल्या जाळीचा वापर मासेमारीसाठी केला जातो. हे झाड आग (fireproof) सहन करतं. फाइलोड्स झुडपांच्या आगीची धग हे झाड कमी करते. यामुळे आग पसरण्यापासून रोखली जाते. फाइलोड्स झुडपे ही वर्षभर हिरवी असतात. म्हणून ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते, तिथे त्यांची लागवड केली जाते. ब्लॅकवुड झाडाच्या बिया अनेक वर्ष माती आणि जंगलातील पानांमध्ये टिकून राहतात. ऑस्ट्रेलिया आणि जगातील इतर अनेक भागांमध्ये ब्लॅकवुडची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हे वाचा - Branded Products ची फर्स्ट कॉपी म्हणजे काय? एवढ्या स्वस्त का असात या वस्तू? ब्लॅकवुड झाडाची मुळे मजबूत आणि पसरलेली असतात. हे झाड कणखर असते आणि कोणत्याही संकटात डळमळत नाही. अगदी वादळात भूस्खलन झाल्यानंतर ती लोबंकळतात पण आपली जागा सोडत नाहीत. पुन्हा त्याच जागी स्थिर होतात. शहरी भागांमध्ये या झाडामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. कारण, ब्लॅकवुडची मुळे लांब पसरतात. यामुळे मार्गाखालील पाईपलाईनला ती अडकण्याची शक्यता असते. तर ब्लॅकवूड हे झाड दुर्मीळ प्रजातींपैकी एक आहे. म्हणून ते माणसासाठी खूप उपयुक्त ठरतं आणि आपण ते वापरतोही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.