जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shocking! McDonald's Roll मध्ये दिसलं Nipple; पाहताच हादरलेल्या तरुणाने मग...

Shocking! McDonald's Roll मध्ये दिसलं Nipple; पाहताच हादरलेल्या तरुणाने मग...

Shocking! McDonald's Roll मध्ये दिसलं Nipple; पाहताच हादरलेल्या तरुणाने मग...

मॅकडोनाल्डचा रोल उघडून पाहिला आणि मग तरुणाला जे दिसलं ते पाहून त्याने…

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 09 सप्टेंबर : मॅकडोनाल्डचा (McDonald’s) बर्गर किंवा रोल (McDonald’s roll)  खायला तुम्हालाही आवडत असेल. कुणाला व्हेज आवडतं तर कुणाला नॉनव्हेज. एका तरुणानेही असाच एक रोल खरेदी केला. पण जेव्हा त्याने तो रोल खोलून पाहिला तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला (Pig’s Nipple in McDonald’s) .

गेट्सहेडच्या प्रुडोत राहणारा  27 वर्षांचा साइमन रॉबिन्सनने (Simon Robinson) लोकल मॅकडोनाल्डमध्ये गेला. तिथं त्याने बेकन रोल (Bacon roll) ऑर्डर केलं. बेकन रोल खरेदी केला, त्याने तो पार्सल घेतला. त्यानंतर तो आपल्या कारमध्ये जाऊन बसला. बेकन रोल त्याने खायला घेतला. पण त्याआधी त्याने त्याच्या आत काय काय आहे पाहायला तो रोल उघडला. उत्सुकतेने त्याने आतील इंग्रेडिएन्स पाहिले. त्यामुळे त्याला जे दिसलं ते पाहून तो हादरालाच. हे वाचा -  बापरे! पोटदुखीमुळे महिलेने गमावले आपले हातपाय; पोटातील वेदना हलक्यात घेऊ नका द सन च्या रिपोर्टनुसार साइमनने सांगितलं, मी नेहमी मॅकडोनाल्डचं बेकन रोल खातो. ओसीडी असल्याने नेहमी रोल उघडून पाहून खाणं पसंत करतो. यावेळीसुद्धा मी तसंच केलं. माझ्यासोबत असं काही होईल याचा विचारही मी केला नव्हता. जेव्हा रोल जेव्हा उघडून पाहिला तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. सायमनला या रोलमध्ये चक्क एक निप्पल दिसलं.  ते डुकराचं निप्पल होतं, हे त्याला समजलं. पण तरी कन्फर्म करण्यासाठी घरी गेला.  त्याने आपल्या आईला ते दाखवलं. त्याचे फोटो काढले आणि मग त्याबाबत तक्रारही केली. हे वाचा -  नशीबवान! ‘प्लेन, ट्रेन, कार, बस’ 7 भयंकर अपघात; वारंवार मृत्यूला दिला चकवा सकाळी काहीतरी हेल्दी ब्रेकफास्ट करण्याचा त्याचा विचार होता. पण रोलमध्ये असं काही दिसलं आणि मग त्याचं मनच उडाल. आता त्याने व्हेजेटिरिन होण्याचं ठरवलं आहे. आता मला मांस नकोच वाटतं. आता मी शाकाहारी व्हायचा विचार करतो आहे, असं सायमन म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: food , lifestyle
  • First Published :
जाहिरात
जाहिरात