जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमचं बाळही झोपेतून दचकून, घाबरून जागं होतंय का? याची कारणं आणि उपाय समजून घ्या

तुमचं बाळही झोपेतून दचकून, घाबरून जागं होतंय का? याची कारणं आणि उपाय समजून घ्या

तुमचं बाळही झोपेतून दचकून, घाबरून जागं होतंय का? याची कारणं आणि उपाय समजून घ्या

सारखी झोपमोड झाल्यानं लहान मुलं (Kids) चिडचिडी होतात आणि बाळाच्या रडण्यामुळं पालकांची झोपमोड झाल्यास त्यांनाही दिवसभर थकल्यासारखं वाटू शकतं. याला नाईट टेरर (Night Terror) किंवा स्लीप टेरर (Sleep Terror) म्हणतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 फेब्रुवारी : रात्री किंवा दिवसा झोपलेलं मूल दचकून जागं होण्याची आणि जोरजोरानं रडू लागण्याचा प्रकार अनेकदा घडतो. असं वारंवार होऊ लागल्यास पालकांना काळजी वाटू लागते. शिवाय, सारखी झोपमोड झाल्यानं लहान मुलं (Kids) चिडचिडी होतात आणि बाळाच्या रडण्यामुळं पालकांची झोपमोड झाल्यास त्यांनाही दिवसभर थकल्यासारखं वाटू शकतं. याला नाईट टेरर (Night Terror) किंवा स्लीप टेरर (Sleep Terror) म्हणतात. ही स्थिती फार दिवस असल्यास याचा मुलांच्या आरोग्यावरही वाईट (Night Terror Or Sleep Terror In Children) परिणाम होऊ लागतो. किड्स हेल्थच्या मते, रात्री भीतीनं झोपेतून उठणं हा सहसा झोपेत आलेला अडथळा असतो. हा भयानक स्वप्नांपेक्षा अधिक नाट्यमय आणि भीतीदायक असू शकतो. तुमचं मूल अशा परिस्थितीतून जात असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. अशा परिस्थितीत मुलाला मदत करा. त्यांना ओरडू किंवा रागावू नका. ‘नाइट टेरर’ काय आहे? सहसा, अशा तक्रारी 4 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये झोपेदरम्यान दिसू शकतात. कधीकधी अशी लक्षणं 18 महिन्यांच्या मुलांमध्ये देखील दिसतात. ज्यांच्या कुटुंबात कोणाला तरी झोपेत चालण्याची सवय किंवा तशी लक्षणं आहेत, अशा मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. रात्रीची ही भीती सहसा दोन ते तीन तासांच्या झोपेनंतर उद्भवते. हे तुम्हाला सुरुवातीला एक भीतीदायक स्वप्न वाटू शकतं. परंतु, या स्थितीत मुलं खूप जास्त घाबरलेली असू शकतात. तसंच, ती या स्वप्नात हरवलेली आणि त्याच्यासोबत घडणाऱ्या हिंसक कृतीशी संघर्ष करत असू शकतात. मूल झोपल्यानंतर झोपेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यावर जातं, तेव्हा त्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेतील काही अडथळ्यामुळं हे होतं. नाईट टेररची कारणं नाईट टेरर कधीकधी काहीतरी भितीदायक पाहिल्यामुळं किंवा भयानक स्वप्नं पडल्यामुळे होऊ शकतो. हे तणाव, थकवा किंवा काहीवेळा कोणत्या तरी औषधाच्या सेवनामुळं देखील होऊ शकतं. कधीकधी ताप आल्यानंतर शरीराचं वाढलेलं तापमान मेंदूच्या कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकतं, तेव्हा मुलांना झोप येत नाही. याच्यामुळं नाईट टेररची स्थिती निर्माण होते. रात्री मूत्राशय पूर्ण भरल्यानंतरही लघवीला न गेल्यामुळं मुलांच्या झोपेमध्ये व्यत्यय येतो. यामुळं नाईट टेररची समस्या उद्भवू शकते. नाईट टेररची लक्षणं - झोपताना विचित्र भावनेनं घाबरलेले दिसणे. - ओरडणं, किंचाळणं आणि जोरजोरात रडणं. - जलद श्वास आणि जास्त घाम येणं. - पाय आणि हातांची आक्रमकपणे हालचाल. - डोळे उघडे दिसत असतानाही सर्वांकडे दुर्लक्ष करणं. - झोपेत चालणं किंवा धावणं. नाईट टेररपासून बचाव करण्यासाठी टिप्स 1. मुलांना धक्का देऊन उठवू नका मूल झोपेत घाबरलेलं असताना पालकांच्या लक्षात आल्यास ते त्याला जागं करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा स्थितीत एकदमच उठवण्याचा प्रयत्न करू नये किंवा जोरजोरात हलवून जागं करू नये. भीतीदायक स्वप्न पडत असताना मन अस्थिर अवस्थेत असतं आणि त्यामुळं मुलाला घाईघाईत उठवल्यानं समस्या जास्त गुंतागुंतीची होऊ शकते. 2. प्रेमानं थोपटून किंवा कुरवाळून उठवा नाईट टेररच्या काळात तुम्ही मुलाला जागं करताना त्याचं सांत्वन करत प्रेमानं थोपटून किंवा कुरवाळून उठवा. तुम्ही त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवा. यामुळं त्याला सुरक्षित वाटेल. बाळाला पुन्हा झोपवण्याचा प्रयत्न करा. हे वाचा -  घरातील लहान मूल कोरोना पॉझिटिव्ह आलं तर लगेच काय करावं? 3. स्‍लीपिंग लाइट या नाइट लॅम्प बाळाच्या झोपण्याच्या खोलीत प्रकाश कमी ठेवा. खोलीत स्लीपिंग लाईट किंवा नाईट लॅम्प वापरल्यास चांगलं होईल. 4. शांत वातावरण मूल जिथं झोपतं ती जागा शांत असावी. तिथं कोणताही आवाज किंवा गोंगाट असू नये. हे वाचा -  तुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का? हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert 5. मुलांना झोपण्यापूर्वी लघवीला आणि शौचाला जाण्याची सवय लावा मुलाला झोपण्यापूर्वी लघवी करायला लावा. जेणेकरून, त्यांचं झोपेदरम्यान मूत्राशय भरल्यानं झोपमोड होण्याची शक्यता कमी होईल. तसंच, पोट साफ झाल्यानं देखील शांत झोप लागेल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी शौच विधी करण्याची सवय असल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. 6. चांगली गोष्ट सांगून झोपण्याची सवय लावा झोपायच्या आधी टीव्ही किंवा मोबाईल ऐवजी चांगली गोष्ट सांगून तुम्ही मुलांना झोपवण्याची सवय लावा. असं केल्यानं त्यांची झोप चांगली होईल आणि मानसिक ताण कमी होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात