जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्ही बाळासाठी Johnson & Johnson Baby Powder वापरत असाल तर सावधान; कॅन्सरचा धोका

तुम्ही बाळासाठी Johnson & Johnson Baby Powder वापरत असाल तर सावधान; कॅन्सरचा धोका

तुम्ही बाळासाठी Johnson & Johnson Baby Powder वापरत असाल तर सावधान; कॅन्सरचा धोका

या ब्रँडचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या बेबी पावडरमध्ये आरोग्याला अत्यंत घातक घटक असल्याचं उघड झाल्यानं कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये (UK) कंपनीच्या भागधारकांनी एकत्र येऊन या पावडरच्या विक्रीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: लहान बाळांसाठी (Products for Babies) सर्वोत्तम उत्पादने वापरली जावीत असा सगळयांचाच कटाक्ष असतो. त्यामुळे बाजारपेठेत गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीचीच उत्पादनं घेण्यास प्राधान्य दिलं जातं. याच निकषांवर लहान बाळांसाठीच्या उत्पादनांमध्ये जगप्रसिद्ध झालेला ब्रँड म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson). या ब्रँडचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या बेबी पावडरमध्ये आरोग्याला अत्यंत घातक घटक असल्याचं उघड झाल्यानं कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये (UK) कंपनीच्या भागधारकांनी एकत्र येऊन या पावडरच्या विक्रीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी आता जगभरात सर्वत्र कंपनीच्या या उत्पादनांवर बंदी येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी टॅल्क (Baby Talc) म्हणजेच बेबी पावडर जगभरात सर्वत्र अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही काळापासून या पावडरच्या शुद्धतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील औषध नियंत्रण यंत्रणेनं (US Regulator) केलेल्या तपासणीत जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या नमुन्यात कार्सिनोजेनिक क्रायसोटाइल फायबर्स आढळले. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीवर, या उत्पादनामुळे महिला आणि मुलांना कर्करोग झाल्याचा दावा करणारे 34 हजारांपेक्षा अधिक खटले चालू आहेत. कंपनीला कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. हे वाचा- Breast surgery नंतर महिलेला झाला जीवघेणा आजार; आता उपचार करणंही अशक्य ही पावडर वैयक्तिक स्वच्छता आणि रॅशवरील इलाजासाठी वापरली जाते. काही वेळा दीर्घकाळ साठवल्यामुळे ही पावडर असबेस्टॉसमुळे दुषित होण्याची शक्यता असते. याचे फायबर शरीरात गेल्यास कर्करोग होऊ शकतो. हे खरं असलं तरी ही बेबी पावडर घातक असल्याचा दावा कंपनीनं फेटाळला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात अमेरिकेत कंपनीविरुद्ध दावे ठोकण्यात आल्यानं कंपनीची विश्वासार्हता ढासळली. परिणामी बेबी पावडरच्या विक्रीत प्रचंड घट झाली. अखेर कंपनीनं 2020 पासून अमेरिका (USA) आणि कॅनडामध्ये (Canada) आपल्या बेबी पावडरची विक्री थांबवली. कॅनडातील न्यूज वेबसाइट नॅशनल पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अमेरिका आणि कॅनडामध्ये या पावडरच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असल्याच्या वृत्ताची पुष्टी झाली आहे. मात्र ब्रिटनसह (UK) जगातील इतर अनेक देशांमध्ये त्याची विक्री सुरू आहे. हे लक्षात घेऊन ब्रिटनमधील जॉन्सनच्या भागधारकांनी ट्यूलिपशेयर (TulipShare) या गुंतवणूकदार प्लॅटफॉर्मच्या (Investment Platform) माध्यमातून या पावडरची विक्री बंद करण्याची मागणी करणारा प्रस्ताव तयार केला आहे. भागधारक आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब व्हावं यासाठी बहुमत जमा करण्याकरता आपले सर्वांचे शेअर्स एकत्र करत आहेत. अमेरिकेतील शेअर मार्केट नियामक ‘एसईसी’लादेखील (SEC) हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये कंपनीच्या वार्षिक बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असून, भागधारकांच्या बहुमतामुळे कंपनीला यातून पळवाट काढता येण्याची काहीही संधी दिसत नाही. हे वाचा- गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी रोज सकाळी करा ‘हे’ काम, फिट राहण्यासाठी खास मंत्र जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी टाल्कच्या वापरामुळे ओव्हेरियन कॅन्सर झाल्याचा दावा करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून, अमेरिकेतील एका न्यायालयाने अशा कर्करोगग्रस्त महिलांनी केलेल्या 22 दाव्यांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या विरोधात निकाल दिला आहे. त्या आदेशानंतर कंपनीला 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 15 हजार कोटी रुपये नुकसानभरपाई आणि खटल्याच्या खर्चासाठी द्यावे लागले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात