मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी तरुणींकडून या पद्धतीचा होतोय मोठा वापर, डॉक्टरांकडून बंदीची मागणी

व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी तरुणींकडून या पद्धतीचा होतोय मोठा वापर, डॉक्टरांकडून बंदीची मागणी

एकीकडे सरकार व्हर्जिनिटी टेस्टवर कायदा आणण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र व्हर्जिनिटी रिस्टोर, रिपेअर करण्याची प्रक्रिया होत आहे.

  • Published by:  Karishma
लंडन, 30 ऑगस्ट : कौमार्य चाचणी अर्थात व्हर्जिनिटी टेस्टचा (Virginity Test) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याविरोधात ब्रिटनच्या डॉक्टरांनी आवाज उठवला असून व्हर्जिनिटी रिपेअरच्या नावाखाली केली जाणारी बनावट ऑपरेशन बंद होत नाहीत, तोपर्यत व्हर्जिनिटी टेस्टवर कायदा बनवून कोणताही उपयोग होणार नसल्याचं, डॉक्टरांचं म्हणणं आहे. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टिट्रिशन्स अँड गायनोकोलोजिस्टने सरकारला याबाबत इशारा देत व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरीवर बंदीची मागणी केली आहे. जर व्हर्जिनिटी रिपेअर प्रक्रियेवर बंदी आणली नाही, तर व्हर्जिनिटी टेस्ट अर्थात कौमार्य चाचणीवर बंदी आणण्याचे प्रयत्नही व्यर्थ असल्याचं रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टिट्रिशन्स अँड गायनोकोलोजिस्टचं म्हणणं आहे. मागील महिन्यात तिथे संसद सदस्यांच्या समितीने एक प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये काही खासगी दवाखान्यांद्वारे होणारी व्हर्जिनिटी टेस्ट हा गुन्हा समजला जावा अशी मागणी केली होती. एकीकडे सरकार व्हर्जिनिटी टेस्टवर कायदा आणण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र व्हर्जिनिटी रिस्टोर, रिपेअर करण्याची प्रक्रिया होत आहे. त्यावर कोणतीही बंदी करण्यात आलेली नाही. व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरीमध्ये गुप्तांगाची एक लेयर ठीक केली जात असल्याचं बोललं जातं. याला हायमनोप्लास्टी असं म्हटलं जातं.

प्रियकराने सेक्सदरम्यान तरुणीसोबत केला विचित्र प्रकार; आता सर्वांना करतेय अलर्ट!

UK मध्ये अधिकतर तरुणी आणि महिला पूर्णपणे व्हर्जिन दाखवण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनच हायमनोप्लास्टी ही सर्जरी केली जाते. 2020 मध्ये झालेल्या एका रिपोर्टमध्ये 22 खासगी रुग्णालयं व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरीच्या नावे मोठी रक्कम उकळत असल्याचं समोर आलं होतं. एका वर्षात तब्बल 9 हजारहून अधिकांनी ही हायमनोप्लास्टी आणि यासंबंधीची माहिती गुगलवर सर्च केली असल्याची माहिती आहे.
First published:

पुढील बातम्या