मुंबई, 29 डिसेंबर : तुम्ही ड्रायव्हिंग (driving) करत नसला तरी गाडीतून प्रवास करताना टायर फुटल्याचा (tyre blast) अनुभव कधी तरी घेतलाच असेल. टायर फुटताच (tyre burst)जो आवाज येतो त्यानंच काळजात धडकी भरते. समजा असाच टायर हवा भरता भरता फुटला तर... आणि तिथं एखादी व्यक्ती असेल तर... तिचं काय होईल? असाचा टायर ब्लास्टचा एक व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.
ट्विटरवर (twitter) टायर फुटल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. Derek ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता. दोन व्यक्ती टायरमध्ये हवा भरत आहेत. हवा भरता भरता अचानक टायर फुटतो आणि एखादा बॉम्ब फुटल्यासारखाच आवाज येतो. व्हिडीओतील आवाज ऐकून अंगावर काटा येतो.
असा टायर फुटल्यानंतर त्याच्या जवळ राहून हवा भरणाऱ्यांचं काय झालं असावं, असंच वाटतं. जसा टायर फुटतो तसं हे दोघंही त्या टायरसोबत उंचावर उडतात. एक व्यक्ती एका दिशेला तर दुसरी व्यक्ती दुसऱ्या दिशेला फेकली जाते आणि दोघंही नंतर जमिनीवर कोसळते. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यांच्या जीवावर तर बेतलं नाही ना अशीच चिंता मनात निर्माण होते. मात्र सुदैवानं तसं काहीही झालं नाही. टायरमध्ये हवा भरणाऱ्या या दोन्ही व्यक्ती सुखरूप आहेत.
हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अधिक माहिती नाही. पण तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. काही ट्विटर युझर्सना मात्र हा व्हिडीओ पाहून हसू आलं आहे. पण खरंतर ही हसण्याची बाब नाही. असं कुणासोबतही घडू शकतं. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं यापुढे तुम्ही टायरमध्ये हवा भरताना विशेष काळजी घ्या असा सल्ला दिला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या नेटिझन्सनीदेखील सर्वांना सावध केलं आहे.
तुम्हीदेखील टायरमध्ये हवा भरत असाल तर कृपया अशी हवा कधीच भरू नका. टायरमध्ये आवश्यक तितकीच हवा भरा. क्षमतेपेक्षा जास्त हवा भरल्यानं टायर तर फुटेलच पण तुमच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे काळजी घ्या.