Home /News /lifestyle /

भारीच! मुलाचा Belly dance video व्हायरल; पाहताच म्हणाल याच्यासमोर तर शकिराही फेल

भारीच! मुलाचा Belly dance video व्हायरल; पाहताच म्हणाल याच्यासमोर तर शकिराही फेल

बेली डान्स (belly dance) नावातच सर्वकाही आहे. त्यामुळे एखाद्या मुलाची किंवा पुरुषाची शरीररचना पाहता, त्यांना असा डान्स करता येत असेल असा विश्वासही बसणार नाही. पण एका मुलानं हे अशक्य ही शक्य करून दाखवलं आहे.

    पाटणा, 29 डिसेंबर : बेली डान्स (belly dance) म्हटलं की सर्वात आधी समोर येते ती शकिरा. शकिराच्या (shakira) बेली डान्सचे (dance) खूप लोक दिवाने आहेत. शिवाय सोशल मीडियावर (social media) आणखी असे बरेच बेली डान्स स्टार आहेत. पण या बहुतेक किंबहुना सर्वच महिला असतात. तुम्ही कधी कोणत्या मुलाला किंवा पुरुषाला बेली डान्स (male belly dacne) करताना पाहिलं आहे का? बेली डान्स ज्याच्या नावातच सर्वकाही आहे. त्यामुळे एखाद्या मुलाची किंवा पुरुषाची शरीररचना पाहता, त्यांना असा डान्स करता येत असेल असा विश्वासही बसणार नाही. पण एका मुलानं हे अशक्य ही शक्य करून दाखवलं आहे. बिहारमधील (bhiahr) पहिला मेल बेली डान्सर (male belly dancer) मानव झा (manav jha). कटिहारमधील कटोरिया गावात राहणारा मानव दहावी पास आहे. पण तो इतका सुंदर बेली डान्स करतो की त्याच्यासमोर प्रसिद्ध बेली डान्सर शकिराही फेल ठरली आहे. मानवच्या बेली डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाला आहे. मानवचे वडील मनोज झा एक सामान्य शेतकरी आहेत. मुलगा असूनही मुलींच्या या नृत्याकडे त्याचा कल असल्यानं मनोज यांना बरीच बोलणी ऐकावी लागली. हे वाचा - Teddyच्या छातीला कान लावताच त्याच्या डोळ्यात आलं पाणी; नेमकं काय झालं पाहा VIDEO समाजाकडून टोमणे ऐकावे लागले. मात्र तरी मानल खचला नाही, हरला नाही. जितके लोक त्याला बोलू लागले, तितकीच जिद्द त्याच्यात निर्माण झाली. जिद्दीनं तो उभा राहिला आणि आपण बेली डान्स शिकायचंच हे त्यानं मानशी पक्कं केलं. फक्त आवड, हौस म्हणून तो बेली डान्स शिकला नाही तर त्यालाच आपलं करिअरही बनवलं. दिल्लीतील बंजारा स्कूल ऑप डान्समधून त्यानं याचं विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. हे वाचा - क्या बात है! चिमुरडीनं केली जादू आणि तिच्यासमोर हजर झाला गायींचा कळप; पाहा VIDEO या नृत्याबाबत सांगताना मानव म्हणाला, इंडियन क्लासिक डान्सप्रमाणेच बेली डान्सही शरीराचं फिटनेस राखण्यासाठी मदत करतं. हा एकमेव असा डान्स आहे, जो गरोदर महिला गरोदरपणाच्या 9 महिन्यांपर्यंत करू शकतात. मानवला आता सरकारी मदतीची अपेक्षा आहे. सरकारनं आपल्याला मदत दिली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास त्याला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bihar, Social media viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या