Home /News /national /

पाहा Video: क्षणार्धात राजकीय मंच जमीनदोस्त, तीन डझन कार्यकर्त्यांसह आमदारही झाले जखमी

पाहा Video: क्षणार्धात राजकीय मंच जमीनदोस्त, तीन डझन कार्यकर्त्यांसह आमदारही झाले जखमी

Viral Video: आमदार साहेबांनी (MLA) एका स्वागत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सुरुवातीला कार्यकर्त्यांची जोरदार भाषणबाजी झाली आणि मुख्य कार्यक्रम सुरू व्हायला आणि स्टेज .कोसळून (Stage Collapse) पडायला गाठ पडली.

    मोतिहारी, 29 डिसेंबर: राजकीय व्यासपीठावरून नेते मंडळी जोरजोरात भाषण देत असताना, ऐनवेळी मंडप कोसळला किंवा मंचच अचानक खचला तर.. खरंच तसं झालं. जोशात भाषणं सुरू असतानाच राजकीय व्यासपीठ (Stage) जमीनदोस्त (Collapse) झालं. हा VIDEO पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social media) एक प्रचंड व्हायरल (Viral Video) झालेला हा VIDEO होता. बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीच्या वेळचा (Assembly election) हा व्हीडिओ पुन्हा एकवार सोशल मीडियावर फिरतोय. हे प्रकरण बिहारमधील पूर्व चंपारण येथील आहे.  सुगौली विधानसभेच्या आमदारांनी एका स्वागत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रम सुरू व्हायला आणि स्टेज कोसळून पडायला गाठ पडली, त्यामुळे त्यांना कार्यक्रम मध्येच सोडून माघारी जावं लागलं आहे. या घटनेत आमदार जखमीही झाले आहेत. सुगौली विधानसभेचे आरजेडीचे आमदार शशीभूषण सिंह नागरीक स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अमोदेई गावी आले होते. आमदारांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली होती. व्यासपीठ फुलं आणि फुगे लावून सजवलं होतं. आमदार मंचावर पोहचताच गावातील काही मुलींनी त्यांच्यासाठी स्वागतगीत म्हणायलाही सुरुवात केली होती. आमदाराच्या स्वागतासाठी मुलींनी स्टेजवरून स्वागतगीत गायला सुरुवात केली होतीच, तेवढ्यात मंच कोसळला. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते खाली पडले. नेते पडताच खुर्ची आणि साउंड बॉक्सही त्यांच्या अंगावर पडला आणि सर्वत्र गोंधळ उडाला. यानंतर हा कार्यक्रम थांबवण्यात आला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आमदारासह तीन डझन नेते मंचावर उपस्थित होते. या घटनेत काही लोक अर्धवट जखमीही झाले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदारही किरकोळ जखमी झाले आहेत. मोतीहारीमधील घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Viral video.

    पुढील बातम्या