Home /News /lifestyle /

ट्विटवरवर DDLJ फिव्हर; शाहरूख-काजोलऐवजी आले राज-सिमरन; चाहत्यांसाठी स्पेशल Emoji

ट्विटवरवर DDLJ फिव्हर; शाहरूख-काजोलऐवजी आले राज-सिमरन; चाहत्यांसाठी स्पेशल Emoji

DDLJ ला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद सोशल मीडियावर साजरा केला जातो आहे.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि काजोल देवगणची (kajol devgan) रोमँटिक फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेला (dilwale dulhania le jayenge) आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 ऑक्टोबर 1995 साली DDLJ  फिल्म रिलीज झाली. आज या फिल्मची सिल्व्हर जुबली आहे.  90 च्या दशकात हिट ठरलेली अशी ही लव्हस्टोही. आजही तितक्याच आवडीने पाहिली जाते आणि आज तर या फिल्मला 25 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने सोशल मीडियावर सध्या DDLJ फिव्हर चढला आहे. ट्विटरवर डीडीएलजेचीच चर्चा सुरू आहे.  आज तुम्हाला ट्विटरवर शाहरूख खान आणि काजोल देवगण नाही तर राज आणि सिमरन दिसतील. फिल्ममधील ही दोघांचीही नावं आणि हे लूक आहेत. दोघांनीही आपल्याला या फिल्मसाठी भरभरून प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानलेत. DDLJ ला 25  वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने काजोलने आपल्या ट्विटर हँडलवरील नाव सिमरन केलं आहे, तिच्या डीपीवरही सिमरन दिसेल. "राज आणि सिमरन. 2 लोक, एक फिल्म, 25 वर्षे आणि कधीच न थांबणारं प्रेम. आज हे ज्यांच्यामुळे आहे, त्या सर्व लोकांचे मी आभार मानते", असं ट्वीट काजोलनं केलं आहे. हे वाचा - नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO शाहरूख खानने आपल्या ट्विटवर हँडलवरील नाव बदलून राज मल्होत्रा, शिवाय डीपीवरही राज मल्होत्राच दिसेल. "25 वर्षे. राज आणि सिमरनला हृदयापासून प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार. यामुळे नेहमी एक खास असल्यासारखं वाटतं", असं ट्वीट शाहरूखनं केलं आहे. हे वाचा - अमृता रावच्या घरी थोड्याच दिवसात येणार 'नवा पाहुणा', शेअर केला Baby Bumpचा फोटो शाहरूख आणि काजोलच नाही, तर ही फिल्म पाहिलेला प्रत्येक जण या फिल्मसंबंधी आपल्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. फिल्ममधील आपला फेव्हरेट सीन, आवडतं गाणं, आवडते डायलॉग यांचीच चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर हा असा फिव्हर असताना ट्विटर तरी कसं मागे राहिलं. हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ट्विटरनेदेखील एक खास इमोजी तयार केलं आहे. ट्विटरवर एक बेल दिसेल. ही तिच cowbell आहे, जी या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. राज आणि सीमरन या दोघांमझील प्रेमाचं प्रतीक. DDLJ संबंधी हॅशटॅग टाकताच ही बेल त्याच्यासमोर दिसेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood, Shahrukh khan, Yashraj films

    पुढील बातम्या