मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुंदर दिसण्यासाठी लावले Fake eyelashes आणि महिलेचे डोळे...; भयंकर Photo पाहून तुम्हीही हादराल

सुंदर दिसण्यासाठी लावले Fake eyelashes आणि महिलेचे डोळे...; भयंकर Photo पाहून तुम्हीही हादराल

फेक आयलॅश लावणं महिलेला चांगलंच महागात पडलं.

फेक आयलॅश लावणं महिलेला चांगलंच महागात पडलं.

फेक आयलॅश लावणं महिलेला चांगलंच महागात पडलं.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 26 ऑक्टोबर : प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावं असं वाटतं. डोळे (Eye) हासुद्धा सौंदर्याचा एक भाग आहे आणि डोळ्यांच्या सौंदर्यात डोळ्यांच्या पापण्यांवरील केस महत्त्वाचे. डोळ्यांच्या पापण्या आकर्षक दिसाव्यात यासाठी नकली आयलॅशही मिळतात. बऱ्याच महिला या आयलॅशचा वापर करतात. अशीच फेक आयलॅश (Fake Eyelash) वापरणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे (Fake Eyelash reaction).

इंग्लमडमध्ये राहणारी 25 वर्षांची जेसिका शन्नों (Jessica Shannon)  आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला गेली होती. आपले डोळे मोठे आणि अधिक सुंदर दिसावेत म्हणून तिने आपल्या डोळ्यांवर आयलॅश लावले होते. पार्टीवरून ती घरी परतली आणि झोपली.

पण रात्री तिच्या डोळ्यांना खाज येत होती, डोळ्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. सकाळी तिने आपला चेहरा आरशात पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. तिचे डोळे आणि चेहरा पूर्णपणे सूजला होता.  जसं कुणी तिच्या चेहऱ्यावर एक मुक्काच मारला असावा असं वाटत होतं.

हे वाचा - बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले 16 टूथब्रश; एक वाईट सोडवण्यासाठी भयंकर उपाय

तिला आयलॅशच्या ग्लूचे साइड इफेक्ट झाले होते. आयलॅश डोळ्यांवर लावण्यासाठी जो ग्लू वापरला होता त्यामुळे रिअॅक्शन झाली होती.

जेसिकाने सांगितलं, तिला फेक रशियन आयलॅशमुळे अॅलर्जी झाली होती. तिने याआधीसुद्धा हे आयलॅश वापरले होते पण तेव्हा तिला असा त्रास झाला नाही. तिने दुसऱ्यांना हे आयलॅश लावले तेव्हा तिचे डोळे सुजले. तिला डोळे उघडताही येत नव्हतं. ग्लूमुळे डोळे चिकटले होते.

तशीच तिने डॉक्टरांकडे धाव घेतली.

तिने मेडिकलमधून आयड्रॉप्स आणून डोळ्यात टाकले पण तिच्या डोळ्यातील जळजळ कमी झाली नाही. अखेर तिने रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तिला कॉर्नियल एब्रेशन झाल्याचं सांगितलं. जवळपास आठवडाभर औषधं घेतल्यानंतर तिच्या डोळ्यातील वेदना कमी झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं थोडा जरी उशीर झाला असता तर तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली असती. सुदैवाने जेसिकावर वेळेत उपचार झाले.

हे वाचा - अरे बापरे! आयड्रॉपऐवजी डोळ्यात टाकला नेल ग्लू; महिलेची झाली भयंकर अवस्था

याआधी याच आयलॅशच्या ग्लूमुळे ब्राझीलमध्ये एका महिलेने आपल्या डोळ्यांची दृष्टी गमावली होती.  रोंडोनियामधील 41 वर्षीय महिला डोळ्यांच्या पापण्यांवर नकली आयलॅशेस लावण्यासाठी ब्युटी सलूनमध्ये गेली. आयलॅशेस लावण्यासाठी जो ग्लू वापरला जातो तो तिच्या डोळ्यामध्ये पडला. त्यानंतर तिच्या डोळ्यात वेदना झाल्या आणि नंतर तिला एका डोळ्याने दिसणं बंद झालं, तर दुसऱ्या डोळ्याने तिला धूसर दिसू लागलं, असा दावा या महिलेनं केला होता.

त्यामुळे तुम्हीदेखील फॅशन, स्टाइल आणि सुंदर दिसण्याच्या नादात असं काही करत असाल तर काळजी घ्या. नाहीतर हा नाद चांगलाच भारी पडेल.

First published:

Tags: Lifestyle