मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin care: बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा

Skin care: बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा

बेसनाच्या पीठाने घरी फेशियल करून आपण त्वचा काही मिनिटांत चमकदार आणि सुंदर बनवू शकतो. जाणून घेऊया बेसनाने फेशियल करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

बेसनाच्या पीठाने घरी फेशियल करून आपण त्वचा काही मिनिटांत चमकदार आणि सुंदर बनवू शकतो. जाणून घेऊया बेसनाने फेशियल करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

बेसनाच्या पीठाने घरी फेशियल करून आपण त्वचा काही मिनिटांत चमकदार आणि सुंदर बनवू शकतो. जाणून घेऊया बेसनाने फेशियल करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 जुलै : चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अनेकजण फेशियलची मदत घेतात. दुसरीकडे स्कीन केअरसाठी बहुतेक लोक बेसन वापरतात. पण नुसतं बेसन लावणं आता कालबाह्य झालं आहे. आम्ही तुम्हाला बेसन वापरण्याऐवजी बेसनाचे फेशियल कसे वापरायचे ते सांगतो. त्यामुळे आपल्या काही मिनिटांत ग्लोईंग स्कीन मिळू (Skin care tips) शकते.

स्कीन केअरसाठी बेसन खूप पूर्वीपासून वापरले जात आहे. स्कीन केअरसाठी बेसनाची मदत घेणे हा सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. बेसनाच्या पीठाने घरी फेशियल करून आपण त्वचा काही मिनिटांत चमकदार आणि सुंदर बनवू शकतो. जाणून घेऊया बेसनाने फेशियल करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

बेसनाने असे फेशियल करा -

बेसन क्लिंजर -

फेशियल करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही बेसनच्या क्लिन्जरने चुटकीसरशी त्वचा स्वच्छ करू शकता. यासाठी 1 चमचा बेसनमध्ये 1 चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवा.

बेसन टोनर -

चेहरा टोन करणे ही फेशियलची दुसरी स्टेप आहे. बेसन टोनर त्वचेची आर्द्रता राखण्यासाठी उपयुक्त आहे. ते बनवण्यासाठी 1 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडे गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता ती चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

बेसन स्क्रबर

फेशियलची तिसरी स्टेप फॉलो करण्यासाठी तुम्ही बेसनापासून स्क्रबर बनवू शकता. बेसन स्क्रबर त्वचेच्या मृत पेशी काढून चेहरा एक्सफोलिएट करण्याचे काम करते. यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 1 चमचे ओट्स, 2 चमचे कॉर्न फ्लोअर आणि 1 चमचे कच्चे दूध घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार पद्धतीनं स्क्रब करा आणि नंतर 5 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

बेसन फेस पॅक -

फेसपॅक लावणे हा फेशियलचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग आहे. बेसनाचा फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचे बेसनामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा क्रीम मिसळून पेस्ट बनवा. आता ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Skin, Skin care