Kya baat hain! जणू काही कापूसच, इतक्या सहज उचलून नेला वजनदार Gas Cylinder; पाहा जुगाडाचा VIDEO

Kya baat hain! जणू काही कापूसच, इतक्या सहज उचलून नेला वजनदार Gas Cylinder; पाहा जुगाडाचा VIDEO

सिलेंडर (gas cylinder) एका जागेहून दुसऱ्या जागी न्यायाचा म्हटला की तितकी ताकद हवी. पण या व्यक्तीने काहीच कष्ट न घेता एका फटक्यात सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सिलेंडर (Gas Cylinder) हलवायचा म्हटलं तरी घाम फुटतो. मग इतका वजनदार सिलेंडर उचलणं म्हणजे मोठंच काम. मग तो भरलेला असो किंवा रिकामा.  पण एका व्यक्तीने यासाठीसुद्धा जुगाड (Jugaad Video) शोधून काढला आहे. या जुगाडामुळे त्याने सिलेंडर इतक्या सहजपणे उचलला की जणू काही तो प्लॅस्टिकचाच असावा. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  (Viral Video) होतो आहे.

आयएएस अधिकारी एमव्ही राव  (IAS Officer M.V Rao)  यांनी आपल्या ट्वीटवर सिलेंडरचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ग्रासरूट इनोव्हेशन, जीवनाला सोपं बनवलं. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता, व्यक्ती ट्रॉली घेऊन जातो आणि त्याचा वापर करून तो सिलेंडर उचलतो (Man Use LPG Trolley To Lift Gas Cylinder).या ट्रॉलीला खाली चाकं आहेत आणि वर सिलेंडरला पकडण्यासाठी हुक. या ट्रॉलीत सिलेंडर टाकल्यानंतर ही व्यक्ती तो सिलेंडर सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो.

हे वाचा -  VIDEO - पिल्लाचा एक डोळा उघडेना म्हणून आईची धडपड; मांजरीने थेट गाठलं हॉस्पिटल

एखादं खेळणं असावं किंवा कापूस असावं तसा सहज आणि अलगद त्याने सिलेंडर उचलून नेला. त्याला ताकद लावण्याची गरज पडली नाही किंवा कोणते जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. एखादं लहान मूलसुद्धा याच्या मदतीने सिलेंडर नेऊ शकतो, असंच तुमच्या मनातही आलं असेल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: Priya Lad
First published: April 1, 2021, 4:39 PM IST

ताज्या बातम्या