अंकारा, 1 एप्रिल: माणूस असो किंवा प्राणी... या दोघांमध्येही आई ही आईच असते. जी आपल्यापेक्षा आपल्या मुलांचा किंवा पिल्लांचाच जास्त विचार करते. त्यांच्यासाठी धडपड करते. त्यांच्यासमोर प्रत्येक संकटात धाड बनून उभी राहते. त्यांना थोडं जरी काही झालं तरी तिचा जीव कासावीस होता. मग ती त्यांच्यासाठी काहीही करू शकते. सध्या अशाच एका मांजरीचा व्हिडीओ
(Cat video) सोशल मीडियावर व्हायरल
(Social media viral video) होतो आहे. जिनं आपल्या पिल्लासाठी थेट हॉस्पिटल
(Cat reached hospital with kitten) गाठलं.
आपण साधं शिंकलं तरी आपली आई आपल्याला लगेच डॉक्टरकडे नेते. असंच या मांजरीनेही (Mother cat) केलं आहे. तिला आपल्या पिल्लात काहीतरी बदल जाणवला. आपलं पिल्लू बरं नाही हे तिला समजलं. कदाचित तिने थोडे दिवस आपलं पिल्लू बरं होईल याची वाटही पाहिली असेल. पण पिल्लाची प्रकृती जास्तच गंभीर होते आहे, हे तिच्या लक्षात आलं म्हणून मग ती थेट रुग्णालयातच पोहोचली.
व्हिडीओत पाहू शकता मांजराने आपल्या पिल्लाला तोंडात धरलं आहे. रुग्णालयात ती थेट आत चालत येते आणि डॉक्टरांजवळ आणून आपल्या पिल्लाला ठेवते. ही घटना आहे तुर्कस्तानातील. इझामिरच्या काराबग्लारमधील रुग्णालयातील ही घटना.
हे वाचा - टॉयलेट सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video
डेली मेलच्या रिपोर्टनुसार रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, बराच वेळ ही मांजर डॉक्टरांसमोर म्यांव म्यांव करत होती. कुणीतरी माझ्या पिल्लाला तपासा, तिला काय झालं आहे. असंच ती सांगत होती.
डॉक्टरांनी तिच्या पिल्लाला तपासलं. तिच्या एका डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं. ज्यामुळे तिला एक डोळा उघडणंही शक्य नव्हतं. तिच्यावर उपचार करण्यासाठी मग प्राण्यांच्या डॉक्टरची मदत घेण्यात आली. तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकण्यात आलं. तिला औषधंही देण्यात आली. त्यानंतर ती बरी झाली.
हे वाचा - पर्यटकांना दिसलं असं विचित्र काळवीट; त्याच्या शिंगांमध्ये नेमकं काय, सांगू शकाल?
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आईचं प्रेम हे सारखंच असतं, हे या व्हिडीओतून दिसून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.