मुंबई, 22 एप्रिल : अनेक शारीरिक समस्यांवर लोक त्रिफळा (Triphala) खातात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी याचा सर्वाधिक वापर केला जातो. याशिवाय शारीरिक कमजोरी कमी करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, त्वचेशी संबंधित समस्या, पचनशक्ती राखणे, चयापचय वाढवणे, कोलेस्टेरॉल कमी करणे इत्यादींसाठीही याचा उपयोग होतो. याशिवाय त्रिफळा वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. वजन कमी (weight loss) करण्यासाठी आयुर्वेदातही त्रिफळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आवळा, हरड आणि बहेरा या तीन फळांचे मिश्रण करून त्रिफळा तयार केला जातो. या तिन्ही औषधी वनस्पती एकत्र मिसळल्या की त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी त्रिफळा कसा फायदेशीर आहे आणि त्याचे सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता (Triphala for weight loss) आहे.
वजन कमी करण्यासाठी त्रिफळाचे फायदे -
स्टाइलक्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, जर तुम्ही आरोग्यदायी आहाराच्या सवयींसोबतच रोज व्यायाम करत असाल आणि त्रिफळा चूर्ण एकत्र खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी करून वजन कमी करण्यात त्रिफळा महत्त्वाचा आहे, हेही अनेक अभ्यासातून सिद्ध झालं आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (इंडिया) ने एक अभ्यास केला. या अभ्यासात उंदरांना जास्त चरबीयुक्त आहार देण्यात आला. असे आढळून आले की उंदरांना त्रिफळा दिल्यानं त्यांच्या शरीराचे वजन तसेच शरीरातील चरबीची टक्केवारी कमी होण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये आणि ग्लुकोजच्या पातळीतही सुधारणा झाली.
वजन कमी करण्यासाठी त्रिफळा खाण्याचे उपाय
बाजारातील कोणत्याही मेडिकल किंवा आयुर्वेदिक दुकानात त्रिफळा चूर्ण गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्रिफळा चूर्ण तुम्ही थंड पाण्यासोबत घेऊ शकता. दोन चमचे त्रिफळा पावडर एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर राहू द्या. सकाळी सर्वात आधी हे पाणी प्या.
हे वाचा - गॅस, अपचनवर औषधांचा मारा नको; ही 5 फऴं पोटाच्या विकारांवर आहेत फायदेशीर
कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्णही घेऊ शकता. एक ग्लास पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी हे पाणी उकळून घ्या. पाणी अर्धे झाल्यावर थंड करून प्यावे.
एक ग्लास पाण्यात एक चमचा त्रिफळा पावडर आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा घाला. रात्रभर भिजवू द्या. सकाळी उठल्यावर या पाण्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा आणि एकावेळी प्या. वजन कमी करण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी ठरू शकते.
हे वाचा - खाल्लेल्याचं नीट digestion होतंय की नाही? तुम्ही स्वत: या गोष्टींवरून ओळखू शकता
एक कप पाणी उकळा. त्यात एक चमचा त्रिफळा पावडर घाला. 30 सेकंद उकळू द्या. एक कप हे पाणी घाला आणि थंड होऊ द्या. पिण्याआधी, एक चमचा फ्लेक्ससीड पावडर (जवस) आणि थोडे लिंबू मिसळा. चवही चांगली होईल आणि वजन कमी करण्यातही गुणकारी सिद्ध होईल. यासोबतच आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss