मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /VIDEO - झाड कोसळल्याने अख्खं घर उद्ध्वस्त झालं; पण 5 महिन्यांच्या चिमुकल्याला साधं खरचटलंही नाही

VIDEO - झाड कोसळल्याने अख्खं घर उद्ध्वस्त झालं; पण 5 महिन्यांच्या चिमुकल्याला साधं खरचटलंही नाही

छप्पर तोडून झाड बाळ असलेल्य खोलीतच पडलं आणि...

छप्पर तोडून झाड बाळ असलेल्य खोलीतच पडलं आणि...

छप्पर तोडून झाड बाळ असलेल्य खोलीतच पडलं आणि...

वॉशिंग्टन, 09 जुलै : देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना... याचाच प्रत्यय आला तो 5 महिन्यांच्या चिमुकल्याच्या बाबतीत. चिमुकला पाळण्यात असतानाच त्याच्या पाळण्यावर भलंमोठं झाड कोसळलं (Tree fell over baby). पण या चिमुकल्याला साधं खरचटलंही नाही. या चमत्कारिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media viral video) व्हायरल होतो (Shocking video) आहे.

ही घटना आहे अमेरिकेतील. इथल्या एका घरावर मोठं झाड कोसळलं (Tree fell over baby). झाडाच्या वजनामुळे छप्पर तुटलं. झाड थेट घरातच कोसळलं. झाड घरातील त्या खोलीत पडलं, जिथं एक चिमुकला होता.

अवघ्या पाच महिन्यांचं ते बाळ. पाळण्यात शांत झोपलेलं होतं. त्याच्या पाळण्यावरच झाड कोसळलं. आता एवढासा चिमुकला ज्याला काहीच समजत नाही. ते आपल्या बचावासाठी काय धावणार आणि काय जीव वाचवणार.

हे वाचा - VIDEO - एक फ्लिप आणि गटारातच झाला आडवा; स्टाइल मारता मारता तरुण तोंडावर पडला

आपल्या चिमुकल्याच्या खोलीत झाड कोसळलं हे पालकांना समजताच त्याच्या आई-वडीलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांनी लगेचच आपल्या बाळाच्या खोलीच्या दिशेनं धाव घेतली. त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून आपलं बाळ सुखरूप आहे, हे त्यांना कळलं आणि तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला. पाळण्याकडे जाऊन त्याच्या आईने त्याला आपल्या उचलून कुशीत घेतलं. तेव्हा ते बाळ रडायचं थांबलं आणि आईकडे पाहून खुदूखुदू हसू लागलं.

हे वाचा - जगातील तिसऱ्या सर्वात धोकादायक एअरपोर्टवर लँडिंग; VIDEO पाहून हादराल

एका झाडाने त्यांचं घर उद्धवस्त केलं पण त्या बाळाला काहीच हानी झाली नाही. या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही सर्व घटना कैद झाली. या महिलेनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

First published:
top videos

    Tags: Small baby, Viral, Viral videos