COVID-19 वर नाही प्रभावी औषध; मग कसे सुरू आहेत कोरोना रुग्णांवर उपचार पाहा

COVID-19 वर नाही प्रभावी औषध; मग कसे सुरू आहेत कोरोना रुग्णांवर उपचार पाहा

कोरोना रुग्णाला (corona patient) झालेलं संक्रमण नेमकं कसं आहे. यावर त्याची उपचार पद्धत आणि त्याला कोणती औषधं द्यायचं हे अवलंबून आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : सध्या कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभरात थैमान घालतो आहे. जगात कुठेच त्याच्याविरोधात प्रभावी असं औषध नाही. मात्र इतर औषधांनी कोव्हिड 19 या आजारावर उपचार केले जात आहे. जगात आतापर्यंत 41,022,488  कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी  30,619,016 रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांवर नेमके कसे उपचार केले जात आहे, त्यांना कोणती औषधं दिली जात आहेत. असा प्रश्न पडतोच.

कित्येक कोरोना रुग्ण अगदी ठणठणीत बरे झाले आहेत. योग्य उपचारांनी त्यांनी कोरोनाव्हायरसवर मात केली आहे. त्यांना कोणकोणती औषधं देण्यात आली ते पाहुयात.

कोरोना रुग्णाला झालेलं संक्रमण नेमकं कसं आहे, म्हणजे ते सौम्य, मध्यम की गंभीर स्वरूपाचं आहे. यावर त्याची उपचार पद्धत आणि त्याला कोणती औषधं द्यायचं हे अवलंबून आहे.

उदाहरणार्थ, डॅक्सामेथासोनसारखी स्टेरॉइड्स गंभीर आजारी रुग्णाच्या मृत्यूचा धोका कमी करू शकतात. मात्र ज्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं आहेत, त्यांच्यावर या औषधाचा उलट परिणाम होतो.

1) रुग्णालयात दाखल असलेले किंवा रुग्णालयात दाखल नसलेले आणि अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता नसलेले रुग्णांना स्टेरॉइड्स दिलं जातं.

2) रुग्णालयात दाखल असलेले ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे मात्र श्वासोच्छवासाचं मशीन उपलब्ध नाही अशा रुग्णांना अँटिव्हायरल ड्रग रेमिडेसिवीर दिलं जातं. तसंच काही प्रकरणांमध्ये स्टेरॉइड सुद्धा दिलं जातं.

हे वाचा - कोरोनाविरोधात लढण्याचा एक मार्ग फेल; आता गाइडलाइन्समधूनही उपचार हटणार

3) रुग्णालयात दाखल असलेल्या आणि श्वासोच्छवासाच्या मशीनवर अवलंबून असलेल्या रुग्णांना रेमिडेसिवीर आणि स्टेरॉइड दिलं जातं.

4) तसंच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि इतर औषधं या बाबतीत सल्ला देणं पुरेसं आहे कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे अधिकाधिक कोरोना व्हायरसच्या अभ्यासातून आढळून आलं आहे.

5) औषधांव्यतिरिक्त रुग्णांना पोटावर झोपायला लावलं तर त्यांना श्वासोच्छवास नीट करता येतो, त्यामुळे श्वसनाचं मशीनही वापरायची गरज कमी भासू शकते, असं डॉक्टरांना दिसून आलं.

हे वाचा - कोरोनाचं भय संपलं! व्हायरसपेक्षा लोकांना वाटतेय वेगळ्याच कारणाची भीती

अमेरिकेत covid-19 साठी कोणत्याही उपचारांना विशेष मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र काही उपचारांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर इतर पर्यायांचादेखील विचार केला जात आहे. जसंजसं नवनवं संशोधन होत आहे, त्याचे निष्कर्ष समोर येत आहेत, तसतंस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थमधील तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत.

Published by: Priya Lad
First published: October 21, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या