कोरोनाचं भय संपलं! व्हायरसपेक्षा लोकांना वाटतेय वेगळ्याच कारणाची भीती

कोरोनाचं भय संपलं! व्हायरसपेक्षा लोकांना वाटतेय वेगळ्याच कारणाची भीती

कोरोनाच्या (coronavirus) भीतीनं सुरुवातीला लोक घराबाहेरही पडत नव्हते मात्र आता चित्र बदललं आहे. लोक घराबाहेर पडू लागले आहेत. लोकांची मानसिक स्थिती अशी लगेच कशी बदलली याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात पाहा.

  • Last Updated: Oct 20, 2020 07:13 PM IST
  • Share this:

सर्व प्रयत्नांनंतरही कोरोना महासाथ काही नियंत्रणात येत नाही आहे. लोकांसमोर आता दुहेरी आव्हान आहे. पहिलं म्हणजे कोरोनाव्हायरसपासून स्वतःचा बचाव करणं आणि दुसरं म्हणजे लॉकडाऊनचा सामना करताना आपलं दैनंदिन कामकाज सुरू ठेवणं. पण आता लोकांना कोरोना संसर्गाची आधीप्रमाणे भीती वाटत नाही आहे. सुरुवातीला लोक घराबाहेरही पडत नव्हते मात्र आता चित्र बदललं आहे. लोक घराबाहेर पडू लागले आहेत. कोरोना विषाणूसहच आपल्याला जगायचं आहे हे त्यांनी मनाशी पक्कं केलं आहे. या सर्वामागे मानसशास्त्र आहे.

फोर्टिसमधील मेंटल हेल्थ अँड बिहेव्हिरल सायन्सेसचे संचालक डॉ. समीर पारीख यांच्या मते, लोक नैराश्येत आहेत. त्यांना पाठिंब्याची गरज आहे. एका अभ्यासानुसार, भारतीय आता कोरोनाला घाबरत नाहीत तर आर्थिक परिस्थितीला जास्त घाबरत आहेत. यामुळे कोरोनाच्या परिस्थितीतही आधीपेक्षा जास्त लोक रस्त्यावर दिसत आहेत.

डॉ. समीर पारीख पुढे म्हणतात, आर्थिक परिस्थितीमुळे माणसाच्या जीवनावर अधिक आघात झाला आहे. जेव्हा त्याने कर्ज घेतलं होतं तेव्हा ईएमआयचे पैसे भरण्याइतकेही पैसे त्याच्याकडे नसतील असा विचारही त्याचा मनात आला नसेल. अशा लोकांना मदतीची आवश्यकता आहे. जरी आर्थिक मदत दिली गेली नाही, तरी भावनिक आधार देणं गरजेचं आहे. यामध्ये कुटुंब आणि मित्र सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जर अशी परिस्थिती मनावर परिणाम करत असेल तर आपण डॉक्टरांची मदत घेऊ शकता. रुग्णाला कळू द्या की डॉक्टर त्यांच्या मनःस्थितीवर उपचार करू शकतात.

हे वाचा - कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का?

लॉकडाऊन मुळे कित्येक कार्यालयं ठप्प झालीत. लोकांना 2-3 महिने घरात राहणं फारच अवघड गेलं. बर्‍याच लोकांमध्ये याचा मानसिक परिणाम दिसून आला विशेषत: तरुणांवर. आजही बऱ्याचं तरुणांनी लॉकडाऊनमुळे मानसिक संतुलन गमावलं आहे. बरेच लोक इतके संवेदनशील झाले आहेत की त्यांनी सॅनिटायझरचा जास्त वापर करण्यास सुरुवात केली आहे.

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते, उपचार सापडत नाही तोपर्यंत सावधगिरी म्हणजेच कोरोनावर उपचार आहे. म्हणूनच घराबाहेर पडताना, कार्यालयात जाताना  महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या. वेळोवेळी आपले हात स्वच्छ करा. सोशल डिस्टन्सिंग राखा. आपल्याला कोरोना किंवा तशा आजारांपासून दूर राहायचं असेल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. पौष्टिक आहार घ्या, योग आणि प्राणायाम यांना दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा.

हे वाचा - कोरोना काळात निरोगी राहण्यासाठी दररोज घ्या फक्त एक चमचा मध

सर्दी, पडसं, ताप या सामान्य आजारांसाठी घरगुती उपचारांचा वापर करा. रुग्णालयात जाणं टाळा कारण तिथं कोरोनाचा सर्वात मोठा धोका आहे. घरी सकारात्मक वातावरण ठेवा. चांगली पुस्तके वाचा, चांगलं संगीत ऐका. आपण या गोष्टी लक्षात घेतल्यास कोरोना काळातही आपण सामान्य जीवन जगू शकाल, असं डॉ. मोहन यांनी सांगितलं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – संसर्गजन्य रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 20, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या