Home /News /lifestyle /

कोरोनाविरोधात लढण्याचा एक मार्ग फेल; आता गाइडलाइन्समधूनही उपचार हटणार

कोरोनाविरोधात लढण्याचा एक मार्ग फेल; आता गाइडलाइन्समधूनही उपचार हटणार

महाराष्ट्र आणि दिल्लीतील कोरोना रुग्णांवर या पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपचार केले जात होते. मात्र आता कोरोनाव्हायरसवरील (coronavirus) उपचारांच्या गाइडलाइन्समधून हा उपचार हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : कोरोनाविरोधात (coronavirus) प्रभावी असे उपचार नाहीत. मात्र कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताने कोरोना रुग्णांना वाचवता येईल, अशी आशा होती. मात्र आता ही आशादेखील विरली आहे. कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी (convalescent plasma therapy) फारशी प्रभावी ठरत नसून आता ही थेरेपी कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलमधूनही हटवली जाणार आहे, इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR)  ही माहिती दिली आहे. आयसीएमआरने प्लाझ्मा थेरेपीवर याआधी अनेक वेळा प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. ही थेरेपी फारशी प्रभावी नसल्याचं सांगितलं होतं. आता मंगळवारी पत्रकार परिषदेत आयसीएमआरने ही थेरेपी कोरोनाव्हायरसच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉल गाइडलाइन्समधून प्लाझ्मा थेरेपी हटवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं. प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल सुरू होतं. ही थेरेपी प्रभावी आहे, असे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. उलट या थेरेपीचा फारसा परिणाम होत नाही, असंच आयसीएमआरच्या अभ्यासात दिसून आलं आहे. 22 एप्रिल ते 14 जुलैदरम्यान भारताच्या 39 सरकारी आणि खासगी रुग्णालयात 464 रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला. 235 रुग्णांंना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. 229  रुग्णांना सामान्यपणे जे उपचार दिले जात आहेत ते उपचार देण्यात आलेत. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांना सामान्य उपचार दिलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरं होण्यासाठी 24 तास म्हणजे एक दिवस जास्त लागत असल्याचं दिसून आलं. प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना संक्रमितांचा मृत्यूचा दर कमी होत नाही, असं आयसीएमआरने याआधी स्पष्ट केलं आहे. हे वाचा - PM Modi : विसरू नका lockdown संपला तरी coronavirus संपलेला नाही तसंच प्लाझ्मा थेरेपीमध्ये अनेक धोकेही आहेत. अॅलर्जिक रिअॅक्शन आणि फुफ्फुसाला हानी पोहोचून ही थेरेपी जीवघेणीही ठरू शकते, असंही ICMR ने सांगितलं आहे. दरम्यान आता ही थेरेपी थांबवण्याचा विचार सुरू आहे. आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलराम भार्गवा यांनी सांगितलं, कोव्हिड 19 संबंधी नॅशनल टास्क फोर्सशी चर्चा सुरू आहे. नॅशनल ट्रिटमेंट गाइडलाइनमधून प्लाझ्मा थेरेपी हटवण्याचा विचार आहे. दरम्यान प्लाझ्मा थेरेपीला पर्याय म्हणून अँटिसेरा ट्रिटमेंट सुरू करण्याचा आयसीएमआरचा विचार आहे. आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल (Biological E. Limited, Hyderabad) कंपनीने मिळून घोड्याचा वापर करून एक अँटिसेरा (Antisera) विकसित केलं आहे. हे वाचा - भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येईल का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. ज्यामध्ये एखाद्या विशेष आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं (antibody) प्रमाण अधिक असतं. कोणत्याही विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत. याच्या क्लिनिक ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.

    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या