Home /News /lifestyle /

Monsoon Travel : पावसाळ्यात फिरण्यासाठी 'हे' आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट द्या

Monsoon Travel : पावसाळ्यात फिरण्यासाठी 'हे' आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट द्या

Summer Holiday, Monsoon Travel, Monsoon Weekend Destinations, Weekend Destination, Lonavala, Kokan Coast, Tapola, Amboli Ghat, Kalasubai Mountain, Bhandardara, Lifestyle, पावसाळ्यात फिरण्यासाठी परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, विकेंड डेस्टिनेशन

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून : फिरण्यासाठी शक्यतो उन्हाळ्याची (Summer Holiday) निवड करतात. पण काही लोकांना पावसाळ्यात फिरण्याची (Monsoon Travel) विशेष आवड असते. पावसामुळे अनेक ठिकाणं जिथे उंचवटा आहे किंवा झाडं झुडपं आहेत. अशी ठिकाणं खूप हिरवीगार, आल्हाददायक आणि चैतन्याचे भरपूर असतात (Monsoon Weekend Destinations) ज्याचा तुम्ही इतर ऋतूंमध्ये आनंद घेऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही ठिकणांबद्दल सांगणार आहोत. जी पावसाळ्यात विशेष सुंदर असतात आणि जिथे एकदा तरी जायलाच हवं. लोणावळा लोणावळा (Lonavala) हे अत्यंत मोहक, सुंदर आणि रिफ्रेशिंग हिल स्टेशन आहे. लोणावळा हे त्याच्या आकर्षक हिरव्या टेकड्यांसाठी ओळखले जाते. इथे गेल्यावर खूप शांत आणि समाधानाचा अनुभव येतो. लोणावळा मुंबई आणि पुण्याच्या लोकांसाठी एक उत्तम विकेंड डेस्टिनेशन (Weekend Destination) आहे. रोजच्या धावत्या जीवन शैलीतून एखादा शॉर्ट ब्रेक घेण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. कोकण किनारा कोकण किनारा (Kokan Coast) म्हणजेच पश्चिम घाट खरोखरच पावसाळ्यात जिवंत होतो आणि इथे पावसाळ्यात एकदा तरी जायलाच हवं. मुंबईपासून गोव्यापर्यंत दक्षिणेकडे जाणार्‍या किनार्‍यामध्ये नयनरम्य किनारपट्ट्या आहेत. येथे तुम्हाला पोस्टकार्ड-एस्क समुद्रकिनारे, मासेमारीची गावे आणि मोडकळीच्या अवस्थेत मात्र तरीही भव्य असणारे किल्ले पाहायला मिळतील. नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा तापोळा महाराष्ट्रात पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे तापोळा (Tapola). याला पश्चिम किनारपट्टीचे काश्मीर किंवा मिनी काश्मीर असेही म्हणतात. हे ठिकाण मुंबईपासून 300 किमी अंतरावर आणि पुण्यापासून 150 किमी अंतरावर आहे. सुंदर शिवसागर तलावाच्या आजूबाजूला वाढलेले हे क्षेत्र ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांसाठी सर्वोत्तम आहे. आंबोली घाट आंबोली घाट (Amboli Ghat) शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले एक लोकप्रिय हिल स्टेशनवर आहे येथे काही आकर्षक ठिकाणे आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील टोकाला असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी सर्वात सुंदर आणि आवडते हिल स्टेशन आहे. येथे अनेक धबधबे आहेत. जे पावसाळा सुरु झाला की वाहू लागतात आणि अतिशय सुंदर दिसतात. कळसुबाई शिखर कळसूबाई (Kalasubai Mountain) हे महाराष्ट्रातील पर्वत असून ते राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर सुमारे 5400 फूट उंच आहे. राज्यातील हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. शिखरावर पोहोचण्याचा निर्धार असलेल्या ट्रेकर्सना ही पर्वतरांग खूप जास्त आकर्षित करते. पावसाळ्यात येथील दृश्य खूप सुंदर आणि लोभस दिसते. त्याचबरोबर या पर्वतावर तुम्हला शांत आणि सुखद अनुभव मिळतो. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठी वसलेले भंडारदरा (Bhandardara) हे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहे. अनेक धबधबे, निर्वाना शांत पर्वत, सोसाट्याचा वारा, घनदाट झाडी, आणि रोमँटिसिझम आणि आनंद व्यक्त करणारे सुंदर वातावरण. हे भंडारदर्याचे वैशिष्ठ्य आहे. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हेदेखील एक सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Lifestyle, Monsoon, Travel

    पुढील बातम्या