मुंबई, 17 जानेवारी : आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाची आनंदाची गोष्ट असते. योग्य वयात प्रेग्नन्सीचा विचार केल्यास सर्व गोष्टी सहज होतात. मात्र 30 वर्ष वयानंतर गर्भधारणेमध्ये अडचण येण्याची शक्यता असते. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मात्र याचा अर्थ 30 वर्ष वयानंतर गर्भधारणा होऊच शकत नाही, असे अजिबात नाही. तुमच्या जीवनशैलीमध्ये काही छोटे बदल करून गर्भधारण शक्य होऊ शकते. आपल्याला माहित आहे की, स्त्रीचे वय जसजसे वाढत जाते तशी तिची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
वयानुसार स्त्रियांच्या शरीरातील अंड्यांचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही कमी होत जातात. मात्र महिलांव्यतिरिक्त पुरुषांनाही वयानुसार काळजी घेण्याची गरज असते. कारण पुरुषांच्या कमी शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता यांचाही जोडप्याच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमची जीवनशैली योग्य असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचे पालन केल्यास तिशीनंतर गर्भधारणा होण्यास तुम्हाला अडचण येणार नाही.
Ovulation Date : कशी ओळखाल तुमची ओव्ह्युलेशनची तारीख? ही आहे अचूक पद्धत
गर्भधारणेचे नियोजन करा
तज्ञांनुसार पालक होण्यासाठी नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते. वयाच्या तिशीच्या आत गर्भधारणेचे नियोजन करावे. कारण या काळात महिलांच्या शरीरातील अंड्यांचा दर्जा आणि प्रमाण अगदी बरोबर असते. वयाच्या 30 नंतर स्त्रियांमध्ये गर्भपाताचा धोका वाढतो आणि अंड्यांचा दर्जा आणि प्रमाण कमी होऊ लागते. तिशीनंतर गर्भधारणा झाल्यास महिलांना एंग्झायटीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
निरोगी आहार घ्या
गर्भधारणेचा विचार करत स्त्रियांनी जंग फूड अजिबात खाऊ नये. अशा वेळी दैनंदिन आहारात केवळ पोषक तत्वांचा म्हणजेच फळे, भाज्या, कार्ब्स, प्रोटीन्स आणि गुड फॅट्सचा समावेश करावा. यामुळे होणाऱ्या बाळासाठी शरीर तयार होईल. बऱ्याचदा प्रेग्नन्सीदरम्यान महिलांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. अशावेळी जास्तीत जास्त गाजर खाल्ल्यास अॅनिमियाच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
तणाव कमी करा
प्रेग्नन्सीच्या काळात मातेचे मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात जास्त ताण घेऊ नये. जास्त ताण घेतल्याने आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तणावामुळे हार्मोन्स आणि मासिक पाळी नियंत्रित करणारे मेंदूतील हायपोथालेमस प्रभावित होऊ शकते आणि त्याचा तुमच्या ओव्हुलेशनवर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योगासने आणि ध्यान करू शकता.
दररोज सेक्स करा
दररोज सेक्स केल्याने देखील गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासानुसार जे जोडपे दररोज सेक्स करतात त्यांची गर्भधारणा होण्याची शक्यता ज्यांचे सेक्सचे प्रमाण कमी आहे अशांच्या तुलनेत जास्त असते.
या गोष्टींपासून दूर राहा
गरोदरपणात महिलांना तंबाखू, मद्यपान आणि अनेक मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणेपूर्वी गर्भधारणेदरम्यान या सर्व गोष्टी केल्या तर गर्भधारणा होण्याची शक्यता खूप वाढते. महिलांनी दररोज फक्त 2 ग्लास अल्कोहोल प्यावे असा सल्ला डॉक्टर देतात. यापेक्षा जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेनच्या पातळीत बिघाड होतो, त्यामुळे त्यांच्या शरीरातील अंड्यांची संख्या कमी होऊ लागते आणि त्यांना गर्भधारणेसाठी खूप त्रास सहन करावा लागतो.
प्रेग्नन्सीमध्ये व्हिटॅमिन 'A' ची कमतरता घातक! पाहा कोणते व्हिटॅमिन्स असतात अत्यावश्यक
चहा, कॉफी कमी प्या
तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल तर चहा आणि कॉफी देखील मर्यादित प्रमाणात प्या. कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ शकते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy