जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात वाफाळलेल्या चहासाठी फ्लेवर शोधताय? मग तुळशीच्या पानांचा असा करा वापर

पावसाळ्यात वाफाळलेल्या चहासाठी फ्लेवर शोधताय? मग तुळशीच्या पानांचा असा करा वापर

तुळशीचा चहा

तुळशीचा चहा

जर तुम्ही तुळशीच्या पानाची पावडर करून ती चहासाठी वापरली तर चहाला सुंगध तर येतोच, शिवाय त्याची चवदेखील अधिक चांगली होते. तुळशीच्या पानांची पावडर कशी साठवायची पाहा.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 जुलै :  हिंदू संस्कृतीमध्ये घरासमोर तुळशीचं रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. धार्मिक श्रद्धांच्या आधारे हिंदू कुटुंबात तुळशीच्या झाडाची पूजा केली जाते, आणि तिला दररोज श्रद्धेनं पाणी घातलं जातं; पण तुम्हाला माहिती आहे का, तुळस माणसाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं विविध फायदे मिळतात. जर तुम्ही तुळशीच्या पानाची पावडर करून ती चहासाठी वापरली तर चहाला सुंगध तर येतोच, शिवाय त्याची चवदेखील अधिक चांगली होते. तुळशीची पानं वाळवा चहामध्ये तुळशीची पानं टाकल्यानं त्याची चव आणि सुगंध दोन्ही वाढतं. दररोज चहामध्ये तुळशीची पानं टाकणं सोयीस्कर व्हावं, या साठी ती वाळवून ठेवणं फायद्याचं ठरतं. चहाच्या पत्तीमध्येही टाकता येतात पानं तुळशीची पानं वाळवल्यानंतर त्याची तुम्ही पावडर करू शकता, व ही पावडर दररोज चहा करताना त्यामध्ये टाकू शकता. परंतु जर तुम्हाला पावडर करणं शक्य नसेल, तर अशावेळी तुम्ही वाळलेली तुळशीची पानंही चहाच्या पत्तीमध्ये टाकू शकता. अशा प्रकारे वर्षभर तुम्ही कोणत्याही स्वरुपात तुळशीच्या पानांचा वापर करू शकता. हेही वाचा - रक्ताची कमी पूर्ण करण्यासाठी हे फळ आहे रामबाण औषध, तज्ञांनी केला हा महत्त्वाचा दावा घरच्याघरी बनवता येते पावडर तुळशीच्या पानांची पावडर अनेकजण बाजारातून विकत आणतात, व ती चहासाठी वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही घरच्याघरी तुळशीच्या पानांची पावडर अगदी सहज बनवून ती वर्षभर साठवून ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची गरज नाही. अवघ्या काही तासांमध्ये तुळशीच्या पानांची पावडर तुम्ही तयार करू शकता. अशी बनवा पावडर तुळशीची पानांची पावडर बनवण्यासाठी सर्वांत प्रथम तुळशीची पानं तोडा. ही पानं तोडताना ती देठापासून तोडली जातील, याची काळजी घ्या. यानंतर पंख्याच्या हवेत पानं वाळवून त्यात थोडं पाणी घाला. हेही वाचा -  पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून दूर राहायचं असेल तर ‘अशी’ घ्या नखांची काळजी पानं वाळल्यानंतर त्याची पावडर बनवा पंख्याच्या हवेत काहीवेळ पानं वाळवल्यानंतर ती उन्हामध्ये काहीकाळासाठी ठेवा. त्यानंतर उन्हामध्ये पानं सुकल्यानंतर त्याची पावडर तयार करून ती एका डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता. ही पावडर चहा करताना त्यामध्ये टाकल्यास चहाला सुगंध तर येतोच, शिवाय चहाची चवसुद्धा अधिक चांगली होते. चांगला व सोपा मार्ग तुळशीच्या पानांचं सेवन करण्याचा सर्वांत चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे तुळशीच्या पानांचा चहामध्ये समावेश करणं, हा आहे. तुम्ही तुमचं आरोग्य चांगल राहण्यासाठी या मार्गाचा वापर नक्की करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle , tea
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात