निखिल स्वामी, प्रतिनिधी बिकानेर, 9 जुलै : सध्या हंगामानुसार फळे बाजारात येत आहेत. फळांचे नियमित सेवन शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मात्र, काही फळे अशी आहेत ज्यांचे नियमित आणि पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होते, असे म्हटले जाते. खजूर हे असेच एक फळ आहे, जे विविध औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. या दिवसांमध्ये राजस्थान राज्यातील बिकानेरच्या बाजारात खजूरांची आवक खूप आहे. तसेच लोक खूजर खूप मोठ्या प्रमाणात खरेदीही करत आहेत. खजूर अनेक प्रकार असतात. मात्र, सध्या बाजारात लाल रंगाचे खजूर आले आहेत आणि हे खजूर बाजारात केवळ एक महिन्यासाठी विकले जातात.
किंमत काय आहे दुकानदार राजकुमार गेहलोत यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच हे खजूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. आता पुढील एक महिन्यासाठी ते उपलब्ध राहील. बाजारात त्याची 40 रुपये किलोने विक्री होत आहे. आता रोज 15 किलो खजूरची विक्री होत आहे. खजूराचे अनेक प्रकार असले तरी ही खजूर कच्चीच खाल्ली जाते. पूर्वी ते गुजरातमधून यायचे, पण आता बिकानेरमध्येही खजुराचे उत्पादन घेतले जाते. खजूर खाण्याचे फायदे आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी डॉ.अनुप पानसारी सांगतात की, खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. अॅनिमियाच्या (रक्ताची कमतरता) रुग्णांसाठी खजुराचे सेवन रामबाण उपाय म्हणून काम करते. यासोबतच हे सांधेदुखीसाठीही उत्तम औषध आहे. पाय दुखणे आणि पाठदुखीची समस्या महिलांमध्ये सामान्य आहे. त्यासाठी खजूर खाल्ल्याने या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. यामुळे पचनाचे विकार दूर होतात. त्याचबरोबर अल्सर आणि अॅसिडिटीची समस्याही हे खाल्ल्याने कमी होते, असे तज्ञ सांगतात.