वेलिंग्टन, 06 ऑक्टोबर : अनेकदा वाद इतके विकोपाला जातात की त्याचं रूपांतर हाणामारीत होणं आणि ही हाणामारी इतक्या भयंकर टोकाला पोहोचते की संबंधित व्यक्ती एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.न्यूझीलँडमधील अशाच एका भांडणाचं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका व्यक्तीचं चक्क डोकं फुटलं आणि त्याला आपल्या डोक्याचा निम्मा (Half Skull) भाग गमावावा लागला आहे (Man half skull removed). ब्रिटनमधील (Britain) 26 वर्षीय जोश स्टोरर (Josh Storer) न्यूझीलँडच्या (New Zealand) एका ड्रेनेज कंपनीत प्लंबर म्हणू काम करतो. 9 जुलैला तो एका बारमध्ये गेला. तिथं 56 वर्षांच्या एका व्यक्तीसोबत त्याची मारामारी झाली. दोघंही दारूच्या नशेत होतं. त्यांच्या हाणामारीने इतकं रौद्र रूप धारण केलं की त्या व्यक्तीने जोशचं डोकंच फोडलं. त्याला तात्काळ ऑकलँडच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्याच ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी त्याच्या कवटीचा निम्मा भाग कापून टाकला. हे वाचा - Ouch! हिरोगिरी करताना नको त्या ठिकाणी लागला नेम, रस्त्यावरच कोसळला तरुण डॉक्टरांनी सांगितलं, ,जोशच्या डोक्याला गंभीर दुखापत होती. या भागामुळे मेंदूवर ताण येत होता ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात होता. त्यामुळेच हा भाग काढून टाकावा लागला. कवटीचा निम्मा भाग काढल्यानंतरही जोश जिवंत आहे, हे चमत्कारिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण तो अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला रिकव्हर होण्यात वेळ लागेल. त्यानंतर त्याच्या कवटीचा काही भाग टान्सप्लांट केला जाईल, असंही डॉक्टर म्हणाले. हे वाचा - वर्षभराने धडधडलं बंद हृदय; Artificial Heart पासून मुक्ती मिळालेला पहिला रुग्ण दरम्यान जोशवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.