जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / माकडाशी पंगा घेणं वाघाला पडलं महागात; शिकारीसाठी झाडावर चढताच काय झालं पाहा VIDEO

माकडाशी पंगा घेणं वाघाला पडलं महागात; शिकारीसाठी झाडावर चढताच काय झालं पाहा VIDEO

माकडाशी पंगा घेणं वाघाला पडलं महागात; शिकारीसाठी झाडावर चढताच काय झालं पाहा VIDEO

माकडाची (Monkey) शिकार करायला गेलेल्या वाघाची (Tiger) चांगलीच फजिती झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मार्च : वाघ (Tiger) समोर येताच कित्येकांना घाम फुटतो. वाघाच्या तावडीतून कुणीच सुटत नाही. वाघाच्या शिकारीचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण सध्या अशा वाघाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो माकडाची  (Monkey)  शिकार करण्यासाठी झाडावर चढला पण माकडाशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. माकडाची शिकार करण्यासाठी वाघ झाडाच्या शेंडापर्यंत पोहोचतो. त्यावेळी माकड खालच्या बाजूने लटकत असतो. वाघ हळूहळू माकडाच्या दिशेने पावलं टाकतो. माकडदेखील हुश्शार. तोसुद्धा वाघाच्या पावलांकडे नीट लक्ष ठेवून असतो. वाघाला पाडण्यासाठी तो आधीपासूनच तयारीत होता. फक्त वाघ खाली येतो की नाही यावरच तो लक्ष ठेवत होता.

जाहिरात

वाघ माकडावर झडप घालणार इतक्यात माकड टुणटुण उड्या मारत झाडावर चढलं. वाघ माकडाच्या दिशेने खाली आला आणि माकड वरच्या दिशेने गेले. माकड हललं तेव्हा झाडाच्या फांद्याही हलल्या आणि मग मात्र वजनदार वाघ स्वतःला काही सावरू शकला नाही. झाडाच्या फांद्या हलताच तो झाडावरून खाली कोसळला. हे वाचा -  पंख पसरून दोन पायांवर दुडूदुडू पळणारा सरडा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO वाघ फांदीला पकडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या वजनामुळे ते काही शक्य झालं नाही. तो कोसळत खाली आला आणि धाडकन जमिनीवर आपटला. मग काय वाघाचा शिकारीचा प्रयत्न तर फसलाच पण तो तोंडावरही आपटला. शिकारीत कधीच न हरलेल्या वाघाला माकडाने हुशारीने हरवलं. यावेळी वाघाच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. शिकारी प्रयत्न फसताच तो गुपचूप तसाच जमिनीवर बसून राहिला. जणू काही झालंच नाही. हे वाचा -  एवढ्याशा पालीची शिकार करणं सिंहाला पडलं चागलंच भारी; नेमकं काय झालं पाहा VIDEO आयएफएस ऑफिसर प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या कमजोरीला आपल्यावर भारी पडू देऊ नका, आपली क्षमता ओळखा आणि डोकं लावा, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडलं आहे. माकडाच्या हुशारीचं सर्वांनी कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात