व्हिडीओत पाहू शकता सरडा दोन पायांवर उभा आहे आणि वेगाने पळतो आहे. यावेळी त्याने आपले पुढील दोन हात कमरेवर धरलेले दिसतात. पळताना सरडच्या मानेपासून पोटापर्यंतच्या भागावर पिसाऱ्यासारखं काहीतरी दिसतं. पुढे गेल्यावर सरडा एका दगडावर उडू मारतो आणि तिथं उभा राहतो. त्यावेळी तो आपल्या मानेवरील हा पिसारा फुलवतो. निळ्या रंगाचा असा हा पंख आहे. उभं राहू सरडा आपला हा पंख बाहेर काढतो. हे वाचा - OMG! आगीवर नाही तर 'थप्पड़ मारकर' शिजवलं चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO @SDG2030 या ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या सरड्याची माहितीदेखील दिली आहे. या सरड्याला फॅन थ्रोटेड लिझर्ड (fan-throated lizard) म्हटलं जातं. अशा सरड्याच्या पाच नव्या प्रजातील सापडल्या आहेत. भारताच्या कोरड्या भागामध्ये असे सरडे दिसून आले आहेत, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.This specie is called fan-throated lizard (Sarada Darwini).
One new genus and five new species of fan-throated lizards have been found in the drier parts of India@ParveenKaswan @billpeduto @JaneGoodallInst @parupallik @VincentCoyle1 @ActorMadhavan pic.twitter.com/WwDaADp0Kb — SDG2030 (@SDG2030) March 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Viral, Viral videos