भंडारा, 07 डिसेंबर : दोन प्रेम करणाऱ्या कपलचे शत्रू कमी नसतात. त्यांच्या प्रेमाला विरोध करणारे किंवा त्यांना एकमेकांसाठी दूर ठेवणारे खूप लोक असतात. फिल्ममध्येही हीरो-हीरोईनच्या प्रेमात व्हिलन आडवा आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण रिलेशनशिपमध्ये असा दुरावा फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही सहन करावा लागतो आहे, असंच म्हणावं लागेल. भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात असाच प्रकार घडला आहे. जिथं वाघ आणि वाघिणींच्या प्रेमात व्हिलन ठरतोय तो हत्ती.
भंडाऱ्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील हा प्रकार आहे. नागझिरा अभयारण्यात हत्तींमुळे वाघ-वाघिणींचं मिलन लांबलं आहे. या अभयारण्यात नर वाघांची संख्या जास्त आहे. इथं सध्याच्या घडीला एकूण 16 वाघ आहेत. या वाघांचं वाघिणींसोबत मिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून वाघांची संख्या वाढेल. इथल्या वाघांची संख्या वाढवण्याची सरकारची योजना आहे. या योजनेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली आहे.
16 वाघांसह मिलन करण्यासाठी दोन वाघिणींना आणण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दोन मादी वाघांना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर विभागात ट्रॅक करणं सुरू आहे. ट्रॅक झाल्यानंतर त्यांना जंगलात सोडलं जाणार आहे. ही योजना 20 नोव्हेंबरनंतर राबवण्यात येणार होती पण आता ती लांबणीवर पडली. याचं कारण म्हणजे हत्ती.
हे वाचा - दिसेल तिथं या कीड्याला ठेचून मारा नाहीतर...; शिकारीची पद्धत वाचूनच अंगाचं पाणी पाणी होईल
वाघ-वाघिणींचं मिलन घडवून आणण्याआधीच हत्तींची एंट्री झाली आहे. रानटी हत्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. 23 हत्तींचा हा कळप आहे. या हत्तींना नियंत्रणात आणण्यातच वनविभागाचा वेळ जातो आहे. पण हत्तींकडे प्रशासनाचं लक्ष गेल्याने वाघिणींना ट्रॅक करून त्यांना जंगलात सोडायला मुहूर्त काही मिळत नाही आहे.
त्यामुळे जंगलातही प्यार के दुश्मन आहेत, असंच म्हणावं लागेल.
वाघ-वाघिणींबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?
वाघांची दुनिया बऱ्यापैकी सरळसोट असते. परस्परांच्या क्षेत्रात दखल न देणारे वाघ एका ठराविक मोसमात मिलनाकरता एकत्र येतात. मिलनानंतर वाघ काही दिवस वाघिणीसोबत घालवून आपल्या विभागात निघून जातात. त्यांच्या होणाऱ्या
अपत्यांचे संगोपन सहसा वाघीण एकटीच करते. आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेबाबत वाघीण प्रचंड काळजी घेते. पिल्लं 17-24 महिन्यांची होईपर्यंत आईच्या संरक्षणात राहून शिकार करायला शिकतात.
हे वाचा - वाघाला पाहता पाहता त्याच्या इतके जवळ गेले पर्यटक की...; तुमचं हार्ट सांभाळूनच पाहा हा भयानक VIDEO
दुसऱ्या नरांच्या अपत्यांना वाघ संभाव्य धोका किंवा स्पर्धक या नजरेने पाहतात आणि अशा अपत्यांना मारून टाकतात. म्हणून अपत्य असणारी वाघीण नर वाघांपासून शक्यतो लांब राहते आणि त्यांना जवळपास फिरकू देत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Lifestyle, Tiger, Tigers, Viral, Wild animal