मुंबई, 28 नोव्हेंबर : जंगल सफारी करताना अचानक तुमच्या गाडीसमोर किंवा तुमच्या गाडीच्या दिशेने वाघा सारखा एखादा खतरनाक प्राणी आला तर… फक्त कल्पनेनेच घाम फुटला ना? असं काही घडलं तर साहजिकच कुणालाही भीती वाटेल. तुम्ही ओरडाल, किंचाळाल, जीव वाचवण्यासाठी धडपड कराल. असंच प्रत्यक्षात घडतं ते काही पर्यटकांसोबत. वाघाला पाहण्याच्या नादात ते त्याच्या इतके जवळ गेले की नंतर जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. वाघाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक खुली सफारी जीप दिसते आहे. त्यात काही पर्यटक आहेत. समोर बरीच झाडं दिसत आहेत. या झाडांमध्ये एक वाघ आहे. वाघ दिसतातच पर्यटका त्याच्या पाहण्याच्या उत्सुकतेत गाडी आणखी पुढे नेतात. ते वाघाच्या खूपच जवळ जातात. वाघही तिथं दबा धरून बसलाच आहे. म्हणजे कधी आपल्याला शिकारीची संधी मिळते याचीच तो वाट पाहतो आहे. सुरुवातीला सर्वकाही शांत आहे. फक्त पर्यटकांचा आवाज ऐकू येतो आहे. तसं तिथं आपल्याला कुणीच दिसत नाही. त्यामुळे कुठे, कोण दिसत आहे याचा शोध आपणही घेतो. पण इतक्याच अचानक एक वाघ पळत येतो. यावेळी आपल्यालाही धडकी भरते. हे वाचा - VIDEO - खतरनाक प्राण्याच्या पिंजऱ्यात घुसला तरुण आणि…; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही वाघ पर्यटकांवर हल्ला करण्याच्या तयारीत आलेला असतो. तो गाडीच्या दिशेने झेप घेतो. तोच सर्व पर्यटक मोठमोठ्याने ओरडू लागतात. अगदी कुत्र्याला हाकलावं असं त्या वाघाला हाकलतात. त्याच्यावर काही ना काही मारून त्याला पळवताना दिसतात. गाडीचा ड्रायव्हरही लगेच ती गाडी तिथून पळवतो.
पर्यटकांच्या ओरडण्यामुळे वाघही बिथरतो आणि तो आल्या पावली तसाच मागे पळून जातो. या पर्यटकांचं नशीब चांगलं म्हणून ते वाघाची शिकार होता होता राहिले. त्याच्या तावडीतून बचावले. पण वाघ पाहण्यासाठी त्याच्या इतकं जवळ जाण्याची डेअरिंग त्यांना चांगलीच महागात पडली असती. त्यांच्या जीवावर बेतली असती. वाघाने काही क्षणातच त्यांचा जीव घेतला असता. हे वाचा - बंदिस्त वाघाशी मस्तीही जीवावर बेतली, पिंजऱ्यातील वाघाने असा घेतला जीव; भयानक VIDEO आयएफएस अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कधी कधी वाघाला जवळून पाहण्याची आपली उत्सुकता त्यांच्यासाठी त्यांच्या नैसर्गिक घरातील घुसखोरीशिवाय दुसरं काही नाही. असं त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
Sometimes, our ‘too much’ eagerness for ‘Tiger sighting’ is nothing but intrusion in their Life…🐅#Wilderness #Wildlife #nature #RespectWildlife #KnowWildlife #ResponsibleTourism
— Surender Mehra IFS (@surenmehra) November 27, 2022
Video: WA@susantananda3 @ntca_india pic.twitter.com/B8Gjv8UmgF
हा खतरनाक व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी या पर्यटकांना नशीबवान म्हटलं आहे. तर काहींनी जंगल सफारी करताना सतर्क राहा, असा सल्ला दिला आहे. काहींनी तर अशा सफारीवर बंदी घालायला हवी अशी मागणी केली आहे. तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्या.