फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम, ऑक्सिजन लेवल सुधारण्यास होईल मदत

फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम, ऑक्सिजन लेवल सुधारण्यास होईल मदत

फुफ्फुसं आपल्या शरीरात ऑक्सिजन पोहचवण्याचं काम करतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतात. हे व्यायाम नियमित केल्यानं शरीरातील ऑक्सिजन लेवल सातत्यपूर्ण आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे: फुफ्फुसं हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीराला शुद्ध ऑक्सिजन देण्याचं काम फुफ्फुसं करतात. शरीरातील प्रत्येक क्रिया ही ऑक्सिजनवरच अवलंबून असते. सध्या देशात कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसांत (Lungs) संसर्ग होऊनच व्यक्तीची प्रकृती ढासळते. हा संसर्ग वाढत गेला की, व्यक्तीचा जीवही जातो. त्यामुळे कोरोना काळात फुफ्फुसांचं आरोग्य जपणं आवश्यक झालं आहे. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही व्यायाम करणं गरजेचं आहे.

फुफ्फुसं आपल्या शरीरात ऑक्सिजन पोहचवण्याचं काम करतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतात. हे व्यायाम नियमित केल्यानं शरीरातील ऑक्सिजन लेवल सातत्यपूर्ण आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

एरोबिक्स -

एरोबिक्स (Aerobics) हा व्यायाम प्रकार मोठ्या स्नायूंना एका लयबद्ध गतीनं टारगेट करून फुफ्फुसांची क्षमता वाढवण्याचं काम करतो. नियमित एरोबिक्स केल्यानं हृदय आणि फुफ्फुसं निरोगी होतात आणि शरीराचं संतुलनदेखील वाढतं. आपल्या फुफ्फुसाला मिळालेल्या ऑक्सिजनचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची सवय लागते आणि श्वास घेण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होते. दररोज लांब ब्रिस्क वॉक तर नक्कीच घेतला पाहिजे. स्थिर बायकिंग हा देखील एरोबिक्सचा एक चांगला आणि फायदेशीर प्रकार आहे.

(वाचा - कोरोना रुग्णांवर आता आयुर्वेदिक औषधाने उपचार; AYUSH 64 घेण्याचा सरकारचा सल्ला)

फुफ्फुसांना मजबूत करणारे काही व्यायाम -

स्नायूंना ताण देणारे व्यायाम प्रकार आपल्या बाह्य शरीरासाठी आणि विशेषत: फुफ्फुसासाठी उपयुक्त असतात. हे व्यायाम श्वसनक्रियेतील स्नायूंना मजबूत करण्याचं काम करतात. पिलेट्स नावाचा व्यायाम फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवतो.

हसणं आणि गाणं -

पोटाच्या स्नायूंवर परिणाम करणारी कुठलीही क्रिया ही फुफ्फुसावर देखील परिणाम करते. हसणं आणि गाणं या दोन्ही क्रिया आपल्या फुफ्फुसाला मजबूत ठेवतात. हसल्यामुळे जास्तीत-जास्त हवा फुफ्फुसांमध्ये घेतली जाते. परिणामी त्याची कार्यक्षमता वाढते. अशाच प्रकारे गाण्यामुळे डायाफ्राम म्हणजे पोटातील पडद्याच्या स्नायूंनाही व्यायाम होतो.

वॉटर-बेस्ड एक्झरसाईज -

वॉटर वर्कआउट तुमच्या शरीराला जास्त कष्ट करण्यास प्रेरणा देतं. यामुळे फुफ्फुसं मजबूत होतात. तुम्ही पाण्यात (Water Based Exercise) वेट लिफ्टिंग आणि स्ट्रेचिंग हे व्यायाम करू शकता. नियमित पोहल्यानं देखील फुफ्फुसाला फायदा होतो.

(वाचा - कोरोनातून बरं होण्यासाठी रोज अंडी खाताय? आधी हे वाचा...)

कार्डियो एक्झरसाईज-

या एक्झरसाईजमुळे फुफ्फुसांची क्षमता अनेक पटीने वाढते. फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी दिवसातून किमान अर्धा तास कार्डियो एक्झरसाईज (Cardio Exercise) करणं आवश्यक आहे.

वर्कआउट इन हाय एलिव्हेशन -

हाय अ‍ॅल्टिट्यूड (altitude) म्हणजेच उंचावर ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे तुम्ही उंचावर व्यायाम केल्यास तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होईल. मात्र, हा व्यायाम प्रकार कठीण असल्यानं याची सुरुवात तुम्हाला धिम्या गतीने करावी लागेल. एलिव्हेशन कमी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन आठवडे व्यायाम करावा लागेल.

(वाचा - कोरोना काळात करा हे खास योगासन; इम्युनिटीसह फुफ्फुसंही बनतील मजबूत)

पुश अप्स -

पुश अप्स (Push-ups) हा सुपर पावर ब्रीदिंग एक्झरसाईज (Breathing Exercise) आहे. जो आपल्या फुफ्फुसांची ऑक्सिजन शोषण्याची क्षमता वाढवतो.

अ‍ॅब्डॉमिनल ब्रिदिंग -

या एक्झरसाईजमध्ये तुम्हाला पोटावर झोपायचं असतं आणि एका हाताच्या मदतीने पाठीवर भार देऊन झोपायचं असतं आणि दुसरा हात छातीवर ठेवावा लागतो. हा व्यायाम तुम्ही घरी आरामात करू शकता. यामुळे फुफ्फुस मजबूत होण्यास मदत होते.

First published: May 4, 2021, 10:31 AM IST

ताज्या बातम्या