जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Folic Acid Diet: निरोगी राहण्यासाठी फॉलिक अ‌ॅसिडची शरीराला असते गरज; या गोष्टींचा करा आहारात समावेश

Folic Acid Diet: निरोगी राहण्यासाठी फॉलिक अ‌ॅसिडची शरीराला असते गरज; या गोष्टींचा करा आहारात समावेश

Folic Acid Diet: निरोगी राहण्यासाठी फॉलिक अ‌ॅसिडची शरीराला असते गरज; या गोष्टींचा करा आहारात समावेश

Folic Acid Diet: शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 मार्च : शरीर निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची (Nutrients) गरज असते. फॉलिक अॅसिड हे यापैकी एक आहे. याची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास थकवा, चिडचिड, राग, अशक्तपणा आणि एनीमिया यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांप्रमाणेच शरीरातील फॉलिक अॅसिड म्हणजेच व्हिटॅमिन-बी 9 (Vitamin B9) ची कमतरताही पूर्ण होणे (Folic Acid Diet) आवश्यक आहे. शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. अ‌ॅव्होकॅडो शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी अॅव्होकॅडोचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अॅव्होकॅडो खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायबर, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-के आणि मॅग्नेशियम यांसारखे बरेच पोषक तत्व सहज मिळतील. चणे खा फॉलिक अॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी हरभऱ्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. चणे फॉलिक अॅसिडचा चांगला स्रोत आहेत. हरभरा खाल्ल्याने तुम्हाला अनेक पोषक तत्वे देखील मिळतील, ज्यात प्रथिने, पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. हे वाचा -  फेअरनेस क्रिममध्ये होतोय या घातक घटकाचा अतिवापर; खरेदी करताना तपासा या गोष्टी आहारात सोयाचा समावेश शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सोयाचाही समावेश केला जाऊ शकतो. सोयामध्ये फोलेट अॅसिडसह तुम्हाला पुरेसे लोह, कॅल्शियम आणि प्रथिने देखील मिळू शकतात. अक्रोड अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला पुरेसे फॉलिक अॅसिडही मिळू शकते. एवढेच नाही तर तुमच्या शरीरातील ओमेगा-3 फॅटी अॅसिड, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढण्यासही अक्रोड मदत करेल. हे वाचा -  मधुमेह नियंत्रणात ठेवणं अवघड नाही; हे 4 हर्बल टी दाखवून देतील जबरदस्त परिणाम आहारात ब्रोकोलीचा समावेश करा ब्रोकोली खाल्ल्याने तुमच्या शरीराला फॉलिक अॅसिड सहज मिळू शकते. त्यामुळे ब्रोकोलीचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटॅमिन बी 6, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन के सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. ज्याचा तुमच्या आरोग्यासाठी फायदा होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात