जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Manage Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवणं अवघड नाही; हे 4 हर्बल टी दाखवून देतील जबरदस्त परिणाम

Manage Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवणं अवघड नाही; हे 4 हर्बल टी दाखवून देतील जबरदस्त परिणाम

Manage Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवणं अवघड नाही; हे 4 हर्बल टी दाखवून देतील जबरदस्त परिणाम

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी शुगर लेव्हल (Blood sugar level) नियंत्रणात ठेवण्यासाठी हर्बल टी पिणं फायदेशीर ठरू शकतं. रोज हर्बल टी प्यायल्याने साखरेची पातळी नॉर्मल (Herbal Tea to Control Diabetes) राहू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 मार्च : आपल्याला मधुमेह (Diabetes) असल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला इतर अनेक शारीरिक समस्यांचा धोका वाढतो. आज मधुमेह होणं कॉमन बनत (Lifestyle Disease) चाललं आहे. मात्र, योग्य आहार, व्यायाम, शारीरिक अॅक्टीव राहून आपण मधुमेह बऱ्याच अंशी टाळू शकतो. त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येतं. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी शुगर लेव्हल (Blood sugar level) नियंत्रणात ठेवण्यासाठी हर्बल टी पिणं फायदेशीर ठरू शकतं. रोज हर्बल टी प्यायल्याने साखरेची पातळी नॉर्मल (Herbal Tea to Control Diabetes) राहू शकते. मधुमेह नियंत्रणासाठी हर्बल टी साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोरफडीपासून बनवलेला चहा तुमच्या घरात कोरफडीचे जेलचे रोप असेल तर ते फक्त चेहरा किंवा केसांना लावण्यासाठी वापरू नका. याच्या मदतीने तुम्ही हेल्दी हर्बल टी बनवू शकता. food.ndtv.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, कोरफडीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कोरफड कच्ची खा किंवा ते उकळून त्याचे पाणी प्या. दोन्ही प्रकारे आरोग्याला फायदा होतो. तुम्ही एलोवेरा जेल एक ते दीड कप पाण्यात उकळून सकाळी प्या. हे वाचा -  डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी दालचिनीचा चहा दालचिनी प्रत्येक घरात असते. हा एक अतिशय आरोग्यदायी मसाला आहे, जो मुख्यतः मांसाहारी पदार्थ, बिर्याणी, भाज्यांमध्ये वापरला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा मसाला खूप आरोग्यदायी आहे. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. हळदीचा चहा अनेकजण हळद घालून दूध पितात, त्याचे भरपूर फायदे आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील (Tips to Manage Diabetes) हळदीचा चहा पिण्याचा प्रयत्न करा. हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जळजळ कमी होते. मधुमेह नियंत्रणात राहतो. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन तत्व रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. हे वाचा -  आजार कित्येक उपाय फक्त एक; कडुलिंबाच्या पानांचा ज्युस यामुळे ठरतो गुणकारी दूध घालून चहा पिऊ नका मधुमेह अधिक गंभीर पातळीवर घालवायचा नसेल, तर सर्वप्रथम आपली जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा. हर्बल टी प्यायल्यानं आपण साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतो. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा प्या. त्यात फक्त चहाची पाने आणि पाणी घाला. साखर अजिबात घालू नये. त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी असतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू देत नाहीत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात